Chandrashekhar Bawankule Vs Congress : बावनकुळेंविरुद्ध कामठीत नवा उमेदवार काँग्रेस शोधणार?

Congress will field a strong candidate against Chandrashekhar Bawankule : नागपूरमधील कामठी विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उमेदवारी निश्चित असून, त्यांच्याविरोधात काँग्रेसकडून ताकदीचा उमेदवाराचा शोध सुरू आहे.
Chandrashekhar Bawankule Vs Congress
Chandrashekhar Bawankule Vs CongressSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : कामठी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेच लढतील, असे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे आता काँग्रेस त्यांच्यासोबत कडवा मुकाबल्यासाठी तेवढच्यात ताकदीचा उमेदवाराच्या शोधात आहे.

रामटेक लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या कामठी विधानसभा मतदारसंघात चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी चांगलीच बांधणी केली होती. ते सलग तीन वेळा निवडून आले होते. अनेक दिग्गजांना त्यांनी पराभूत केले. राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर बावनकुळे यांनी आपली पकड अधिकच घट्ट केली होती. त्यांच्याच पुण्याईवर आमदार टेकचंद सावरकर निवडून आले. मात्र चारच वर्षात लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचे मताधिक्य घटले. येथून महायुतीचा उमेदवार राजू पारवे सुमारे 17 हजार मतांनी पिछाडीवर गेले. ही भाजपसाठी धोक्याची घंटी मानली जात आहे. त्यामुळे पुन्हा बावनकुळे यांना भाजप मैदानात उतरवणार असल्याचे समजते. बावनकुळे हेसुद्धा विधानसभा लढण्यास इच्छुक आहेत.

Chandrashekhar Bawankule Vs Congress
Gayatri Shingne : डॉ. राजेंद्र शिंगणेंनी माघार घेऊन विधानसभेला मला पाठिंबा द्यावा; अन्यथा...; पुतणीने दिले चॅलेंज!

काँग्रेसच्या (Congress) यादीत नागपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर येथून सर्वाधिक उत्सुक आहेत. ते माजी मंत्री सुनील केदारांच्या जवळचे आहेत. भोयर यांनी मागील विधानसभेची निवडणूक लढवली होती. थोडक्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे आपणालाच पुन्हा संधी मिळेल, अशी आशा त्यांना वाटत आहे. साधा सरळ माणूस ही त्यांची ओळख आहे. हीच बाब त्यांच्यासाठी मागील निवडणुकीत मारक ठरल्याचे सांगणयात येते.

Chandrashekhar Bawankule Vs Congress
Sulbha Khodke : क्रॉस व्होटिंगने उमेदवार बदलणार! सुलभा खोडके विरुद्ध सुनील देशमुख थेट सामना

राजकरण आणि निवडणुकीसाठी लागणाऱ्या डावपेचांचा त्यांच्याकडे अभाव आहे. जिल्हा परिषदेच्या सदस्या अवंतिका लेकुरवाळे यांचेसुद्धा नाव इच्छुकांमध्ये आहे. बावनकुळेंच्या विरोधात आंदोलन करून त्यांनी आपली उंची वाढवली. त्यांच्या वेगवान वाटचालीने स्थानिकांमधून त्यांना विरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कामठी विधानसभा मतदारसंघात नागपूरच्या शेजारी असलेल्या अनेक वस्त्यांचा समावेश होतो. काँग्रेसला निवडणूक जिंकायची असले तर हुडकेश्वर, बेसा, पिपळा या भागातून उमेदवार देण्याची मागणीसुद्धा जोर धरू लागली आहे. काँग्रेसचे प्रदेश सचिव जयंत दळवी, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राजेश काकडे यांनीही आपले नाव दमटणे सुरू केले आहे.

कामठी मतदारसंघात राजकीय सोबतच जातीय समिकरण महत्त्वाचे ठरणार आहे. हे बघून बावनकुळे यांच्या विरोधात कुणबी समाजाचा उमेदवार देण्याच्या हालचाली सध्या काँग्रेसमध्ये सुरू आहे. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी मराठवाड्यात केलेला प्रयोग यावेळी कुणबी समाजाच्यावतीने विदर्भात करण्याचे ठरवले आहे. त्या दिशेने बैठका घेण्यात येऊन वैयक्तिक मेसेज दिले जात असल्याचे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com