Gayatri Shingne : डॉ. राजेंद्र शिंगणेंनी माघार घेऊन विधानसभेला मला पाठिंबा द्यावा; अन्यथा...; पुतणीने दिले चॅलेंज!

Sindkhedraja Constituency : सूत गिरणी आणि साखर कारखाना माझे आजोबा भास्करराव शिंगणे यांनी चालू केला होता. आमची सर्वांची हीच इच्छा होती की, सूत गिरणी आणि साखर कारखाना राजेंद्र शिंगणे यांच्या वडिलांनी चालू केला होता. त्या संस्था हातातून जाऊ द्यायला नको होत्या.
Gayatri Shingne-Dr. Rajendra Shingne
Gayatri Shingne-Dr. Rajendra Shingne
Published on
Updated on

Buldana, 06 August : डॉ. राजेंद्र शिंगणे हे अजितदादांच्या गटात असून दादांनी फोर्स केला, तर डॉ. शिंगणे हे निवडणुकीला उभे राहतील. पण, डॉ. शिंगणे यांनी माघार घेतली तर ती माझ्यासाठी चांगली गोष्ट राहील. त्यांनी माघार घेऊन मला पाठिंबा द्यावा.

पण, आमचं अजून बोलणं झालेलं नाही. मी माझं काम करत राहणार आणि सिंदखेडराजा मतदारसंघातून मी शंभर टक्के निवडणूक लढवणार आहे, असे सांगून डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात त्यांचीच पुतणी गायत्री शिंगणे यांनी विधानसभेसाठी रणशिंग फुंकले आहे.

गायत्री शिंगणे (Gayatri Shingne)) यांनी नुकताच जनक्रांती मोर्चाचा काढून मतदारसंघातील समस्यांना वाचा फोडण्याचे काम केले आहे. गायत्री शिंगणे या गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघात सक्रीय झाल्या आहेत.

निवडणुकीसंदर्भात गायत्री शिंगणे म्हणाल्या, मतदारसंघात समस्या भरपूर आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. पण आपल्या हातात असूनही आपण त्यांच्यासाठी काही करू शकत नाही, याची आम्हाला खंत आहे. मागील मोर्चाच्या वेळी आम्ही त्यांना (डॉ. राजेंद्र शिंगणे Rajendra Shingne) शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विनंती केली होती. लोकांना पीकविमा, गारपीठीच्या नुकसानीचे पैसे मिळालेले नाहीत.

Gayatri Shingne-Dr. Rajendra Shingne
Sharad Pawar Politics : शरद पवारांची मोठी खेळी; राजेंद्र शिंगणेंना घरातूनच आव्हान देण्याची तयारी; पुतणी उतरणार मैदानात

सिंदखेडराजा मतदारसंघाचा चाळीस ते पन्नास टक्के विकास झालेला आहे, असे आपण म्हणू शकतो. राजेंद्र शिंंगणे यांना मिळालेल्या मंत्रिपदाच्या तुलनेत मतदारसंघाचा विकास झालेला नाही. शिंगणे यांना मिळालेली खाती पाहता लोकांच्या अपेक्षा मोठ्या हेात्या. आमच्या मतदारसंघात एमआयडीसी नाही, महाविद्यालये नाहीत. तरुणांना शिकायला आणि नोकरीसाठी बाहेरगावी जावे लागत आहे, असेही त्यांनी नमूद केले.

गायत्री शिंगणे म्हणाल्या, मतदारसंघातील सूत गिरणी आणि साखर कारखाना माझे आजोबा भास्करराव शिंगणे यांनी चालू केला होता. आमची सर्वांची हीच इच्छा होती की, सूत गिरणी आणि साखर कारखाना राजेंद्र शिंगणे यांच्या वडिलांनी चालू केला होता. त्या संस्था हातातून जाऊ द्यायला नको होत्या. या दोन्ही संस्था बंद पडल्यामुळे मतदारसंघातील रोजगार कमी झाला आहे. शरद पवार यांनी मला संधी दिली तर मी त्या संधीचे सोने करेन. या दोन्ही संस्था मला सुरू करायाच्या आहेत.

Gayatri Shingne-Dr. Rajendra Shingne
Mahayuti Meeting : विधानसभेसाठी मोर्चेबांधणी; उदय सामंतांच्या बंगल्यावर ठरणार महायुतीची निवडणूक रणनीती

सिंदखेडराजा मतदारसंघातील पन्नास ते साठ टक्के जनता माझ्यासाठी पॉझिटिव्ह आहे. मतदारसंघातील लोकांना नवा चेहरा आणि नवे नेतृत्व हवं आहे. मी उद्या निवडून जरी आले तरी २५ वर्षांची कसर पाच वर्षांत तर भरून काढू शकणार नाही. पण आम्ही प्लॅन केल्याप्रमाणे काम करत राहणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com