Lok Sabha Election 2024 : राहुल, सोनियांच्या उपस्थितीत नागपुरातून काँग्रेस फुंकणार रणशिंग

Public Meeting : नेत्यांना दहा लाखांचे ‘टार्गेट’; तयारीबाबत अनेकांमध्ये मात्र उदासीनताच
Congress Meeting in Nagpur.
Congress Meeting in Nagpur.Google
Published on
Updated on

Nagpur News : नव्या वर्षात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथून रणशिंग फुंकणार आहे. यासाठी गुरुवारी (ता. 28) काँग्रेसची महारॅली आयोजित करण्यात आली आहे. रॅलीत किमान 10 लाख लोक आले पाहिजे, असे टार्गेट पक्षातील नेत्यांना देण्यात आले आहे. काँग्रेसच्या दृष्टीने विदर्भातील ही महारॅली अत्यंत महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपूर येथे आहे. उपराजधानी नागपूर भाजपचा गडही आहे. त्यामुळे ही महारॅली काँग्रेसने प्रतिष्ठेची केली आहे. रॅलीला केवळ पाच दिवसांचा अवधी उरला आहे. त्यामुळे इतक्या कमी वेळात 10 लाखाची गर्दी जमविण्याचे आव्हान काँग्रेससमोर आहे.

Congress Meeting in Nagpur.
Nagpur NDCCB Bank : घोटाळा भोवला; माजी मंत्री सुनील केदार यांना पाच वर्षांची शिक्षा!

नागपूर येथील उमरेड रोडवर असलेल्या दिघोरी नाका रोड येथील 80 एकराच्या मैदानावर महारॅली होणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी रॅलीला येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र यासंदर्भात काँग्रेसने अद्याप कोणाचाही दौरा जाहीर केलेला नाही. त्यामुळे प्रतिष्ठेच्या या सभेबद्दल काँग्रेसमध्ये फारसा उत्साह दिसून येत नाही.

काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे हे देखील सभेच्या तयारीबद्दल फारसे उत्सुक नसल्याची चर्चा पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये आहे. सोमवारी (ता. 25) आमदार विकास ठाकरे यांच्या सुपुत्राचा विवाह सोहळा आहे. या विवाह सोहळ्याच्या कामात ठाकरे सध्या व्यस्त असल्याचे सांगण्यात येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असताना एका आलीशान हॉटेलात काँग्रेसमधील नेत्यांची उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल, माजी केंद्रीय मंत्री खासदार मुकुल वासनिक या बैठकीला उपस्थित होते. बैठकीत सभेची तारीख ठरवण्यात आली. कमी वेळेत मोठी गर्दी जमविण्याची जबाबदारी विदर्भातील सर्वच काँग्रेस नेत्यांवर सोपविण्यात आली. मात्र विदर्भातील कोणत्याही जिल्ह्यात सध्या या महारॅलीसंदर्भात उत्साह दिसत नाही. प्रत्येक गावातून कार्यकर्त्यांना नागपुरात जाण्यासाठी व परतीच्या प्रवासाठी वाहन व्यवस्था, चहा, नाश्ता, भोजन यासंदर्भात नेत्यांमध्ये संभ्रम आहे. या सर्वांचा खर्च कोण करणार, हे देखील अनेक जिल्ह्यातील नेत्यांना अद्यापही ठाऊक नाही. अशात 10 लाखांचे ‘टार्गेट’ कसे पूर्ण होणार, असा प्रश्न कनेकांना पडला आहे.

‘झिरोमाइल्स’च्या शहरात दिग्गज

काँग्रेसच्या महारॅलीसाठी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष खासदार सोनिया गांधी, माजी काँग्रेस अध्यक्ष खासदार राहुल गांधी, काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी, काँग्रेसचे सर्व मुख्यमंत्री, कार्यकारी समितीचे सदस्य, विधिमंडळ पक्षनेते, विरोधी पक्षनेते, देशभरातील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. रॅलीबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले म्हणाले की, लोकसभा निवडणूक तीन महिन्यांवर आली आहे. त्यामुळे या महारॅलीच्या निमित्ताने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह व ऊर्जा संचारेल. नागपूरमध्ये होणारी ही महारॅली ऐतिहासिक ठरेल. देशातील परिवर्तनाची मुहूर्तमेढ महारॅलीतूनच रोवली जाईल.

Edited by : Prasannaa Jakate

Congress Meeting in Nagpur.
Nagpur Winter Session : सरकारला विदर्भाचे प्रश्नच सोडवायचे नाहीत; वडेट्टीवारांचा आरोप

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com