Nagpur Winter Session : सरकारला विदर्भातील प्रश्न सोडवायचे नाहीत. त्यांना काही ऐकायचे नाही, त्यामुळेच फक्त बहुमताच्या जोरावर हे अधिवेशन सरकारला गुंडाळायचे असल्याचा आरोप विधान सभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यांनी विदर्भातील प्रश्नांना न्याय मिळावा म्हणून पुढचे दोन दिवस अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची आग्रही मागणी वडेट्टीवार यांच्यासह विदर्भातील सदस्यांनी केली होती.
नागपूर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा (Nagpur Winter Session) आज (20 डिसेंबर) शेवटचा दिवस असून विदर्भातील प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पुढील दोन दिवस विधिमंडळाचे कामकाज वाढवून या दिवसात फक्त आणि फक्त विदर्भातील प्रश्नावर चर्चा व्हावी अशी आमची आग्रही भूमिका होती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्यासह इतर सदस्यांनी मांडली होती.
विदर्भातील अनेक प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. मात्र, सरकारला विदर्भाच्या मुद्द्यावर चर्चा करायची नाही. विदर्भाचे प्रश्न त्यांना सोडवायचे नाही अशीच सत्ताधाऱ्यांची भूमिका आहे. विदर्भातील (Vidarbha) जनतेवर हा अन्याय केला जात असल्याचा घणाघात वडेट्टीवार यांनी सरकारवर केला.
आज कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत आम्ही विधिमंडळ सत्राचे कामकाज आणखी दोन दिवस वाढवावे आणि विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा करावी, या बाबत आग्रही भूमिका मांडली. मात्र सरकार आपल्या बहुमताचा गैरवापर करत अद्याप विदर्भातील अनेक प्रश्न प्रलंबित ठेवले आहे. या दुर्दैवी निर्णयाचा निषेध केला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
निव्वळ बहुमताच्या जोरावर सरकार हे अधिवेशन बुधवार 20 डिसेंबरला गुंडाळायचा निर्णय घेत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. दरम्यान, आरोग्य विभागाच्या एकूण भ्रष्टाचाराच्या संदर्भात सभागृहामध्ये चर्चा झाली. त्यामध्ये बोलताना आरोग्य विभागातील भ्रष्टाचार आम्ही उघड केला.
आरोग्य विभागामध्ये प्रचंड भ्रष्टाचार चाललेला असून बदल्यांचे रॅकेट सध्या सुरू असल्याचे चित्र आहे. आरोग्य खात्यामध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.
(Edited by Amol Sutar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.