Congress Vs BJP : काँग्रेसला स्थापना दिवशीच भाजपने पाडले खिंडार!

Chikhli Congress : चिखलीत पंचायत समिती सभापती व सदस्यासह अनेक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
Chikhli Congress
Chikhli CongressSarkarnama
Published on
Updated on

Chikhli News : आज काँग्रेस पक्ष स्थापना दिवस असून यानिमित्त नागपूर येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर एकीकडे काँग्रेसकडून स्थापना दिवस साजरा केला जात असताना, दुसरीकडे याच दिवशी बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे.

चिखली येथील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे जाऊन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrasekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत भाजप आमदार श्वेता महाले यांच्या नेतृत्वात जाहीर प्रवेश केला आहे. चिखली येथील पंचायत समितीचे सभापती लक्ष्मण अंभोरे व सदस्य राजू पाटील यांच्यासह 35 पदाधिकारी यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Chikhli Congress
Ajit Pawar : नाशिकमध्ये अजित पवार गटाच्या सात नेत्यांना नियोजन समितीची लॉटरी

आमदार श्वेता महाले यांच्या मार्गदर्शनात चिखली पंचायत समितीचे माजी सभापती लक्ष्मणराव मोरे यांच्या नेतृत्वात राजाभाऊ पाटील, गजानन अंभोरे, विजू लंके, पाटीलबा पवार, ज्ञानेश्वर अंभोरे, नारायण झगरे, प्रकाश अंभोरे, प्रसाद अंभोरे, विलास तायडे, सागर लोखंडे, योगेश भुसारी, सदाशिव डुगे, संतोष पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत प्रवेश केला.

दरम्यान नागपूर येथे गुरुवारी काँग्रेसच्या 138व्या स्थापना दिनानिमित्त ‘है तयार हम’ असा नारा देत भव्य महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी(Sonia Gandhi), माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रमुख उपस्थिती होती.

Chikhli Congress
Loksabha Election : 'भुमरे दंड थोपटू की...' ; दानवे कडाडले!

याचबरोबर देशभरातील काँग्रेसशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी महारॅलीला उपस्थित होते. महारॅली सभेतून आगामी निवडणुकीत काँग्रेसला बळकट करण्याचे आवाहन यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

या महारॅलीतून काँग्रेसने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालय व भाजपच्या गडातून काँग्रेसने जोरदार ‘शक्तीप्रदर्शन’ करण्यात यश मिळविले. काँग्रेसचे अनेक दिगग्ज नेत्यांनी या महारॅलीतून मार्गदर्शन करीत भाजप आणि संघावर जोरदार टीका केली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com