
Nagpur News : नागपूर शहरात भाजपचा जनाधार वाढल्याचे विधानसभा निवडणुकीच्या निकालाने स्पष्ट झाले आहे. चांगली प्रतिमा असलेले आणि निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक असलेले साधणे आणि क्षमता असलेले काँग्रेसचे उमेदवार या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. त्यामुळे काँग्रेसचे दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते चांगलेच हादरले आहेत.
दुसरीकडे गटबाजी आणि नेत्यांमधील भांडणे बघता महापालिकेच्या निवडणुकीत तिकीट मिळेल, याची हमी कोणालाच नाही. त्यामुळे वयाची पन्नाशी ओलांडले कार्यकर्ते संभ्रमात पडलेत. काँग्रेसमध्ये राहून निवडून येण्याची खात्री नाही आणि भाजपमध्ये गेलो, तर तिकीट मिळेलच याची शाश्वती नाही, अशा पेचात अनेकजण सापडले आहेत.
महापालिकेच्या निवडणुकीची सध्या सर्वांना वेध लागले आहे. 22 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर निवडणुकीबाबत स्पष्टता येणार आहे. मागील निवडणुकीत भाजपचे 108 नगरसेवक निवडून आले होते. काँग्रेसला (Congress) फक्त 29 नगरसेवकांवर समाधान मानावे लागले होते.
या निवडणुकीतील (Election) तिकीट वाटपावरून प्रचंड राडा नागपूर शहरात झाला होता. तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर शाई व अंडे फेकून कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला होता. याचाही परिणाम महापालिका निवडणुकीच्या निकालावर झाला होता. बोटावर मोजण्या इतपत नगरसेवक असतानाही पाच वर्ष महापालिकेत ते भांड-भांड भांडले. एकमेक्यांच्या खुर्च्या खेचून घेतल्या. दोन गट पडले होते. तो महापालिकेचा कार्यकाळ संपेपर्यंत कायम राहिला. आता पुन्हा निवडणुकीला समोर जाताना याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
हा त्याचा समर्थक, तो त्याचा कार्यकर्ता सांगून तिकीट कापल्या जाईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे राज्यात भाजपची सत्ता आहे. शहरात मजबूत संघटन आहे. त्यामुळे वयाची पन्नाशी पार झालेले काँग्रेसचे कार्यकर्त्यांची महापालिकेची निवडणूक लढण्याची हिंमत खचत चालली आहे.
प्रचार करायला, पैसे लावायला कोणी तयार नाही. त्यामुळे कोणी जोखीम घेण्यास तयार नाही. अनेकांनी आधीच वेगवेगळ्या संघटनेचा झेंडा हाती घेऊन आपले अस्तित्व कायम राहण्यासाठी काम सुरू केले आहे. यापैकी अनेकांना एकदा नगरसेवक म्हणून निवडूण येण्याची इच्छा आहे. भाजपला महापालिकेच्या सर्वाधिक जागा जिंकूण इतिहास घडवायचा आहे. त्यामुळे समाजात प्रभाव राखून आसलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना भाजपच्या नेत्यांनी पक्षात येण्याचे खुले निमंत्रण दिले आहे. प्रश्न फक्त उमेदवारीचा आहे. त्यामुळे अनेकजण संधीच्या प्रतिक्षेत असल्याचे शहर काँग्रेसमधील चित्र आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.