Cricketnama 2023 : नागपुरात टीम नानांची बल्ले.. बल्ले.., 'क्रिकेटनामा' चषक जिंकला!

Shivsena Vs Congress Final Match : शिवसेनेला(शिंदे गट) पराभूत करीत काँग्रेस वॉरीयर्सने पटकावली ‘ट्रॉफी’
Shivsena Vs Congress
Shivsena Vs CongressSarkarnama
Published on
Updated on

Shiv Sena Riders Vs Congress Warriors : पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडानगरी (नागपूर) : अत्यंत चुरशीच्या आणि उत्कंठा शिगेला पोहोचविण्याऱ्या अंतिम सामन्यात विजय मिळवत आमदार नाना पटोले यांच्या नेतृत्वातील काँग्रेसच्या टीमनं सकाळ माध्यम समूहाच्या ‘सरकारनामा’चा ‘क्रिकेटनामा’ चषक पटकावला. यंदा हे स्पर्धेचं दुसरं सीझन होतं. अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकत काँग्रेसने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

मेकोसाबाग परिसरात असलेल्या पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडानगरी, मेथोडीस्ट हायस्कूलच्या प्ले-ग्राऊंड, श्यालोम स्पोर्ट्स ग्राऊंड परिसरात ‘क्रिकेटनामा’चे मंगळवारी (ता. 12) दुसऱ्या दिवसाचे दिमाखदार सामने खेळण्यात आलेत.

राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार स्वागताध्यक्ष व माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके निमंत्रक असलेल्या दुसऱ्या सीझनमधील स्पर्धेचा अंतिम सामना शिवसेना रायडर्स आणि काँग्रेस वॉरीयर्स यांच्यात झाला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shivsena Vs Congress
Cricketnama 2023 : उपांत्य सामन्यात राष्ट्रवादीला पराभूत करत शिवसेना 'Final'मध्ये दाखल!

काँग्रेसचे वझाहत मिर्झा आणि सलमान सुफी सलामीला आले. शिवसेनेच्या पोलार्ड बाजवाने गोलंदाजीला सुरुवात केली. त्यावेळी दोन्ही फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली. ‘आर या पार’ असा निर्णयच जणू ते करून आले होते. पहिल्या षटकात काँग्रेसनं 19 धावा पटकाविल्या. त्यानंतर अमन खालसा आलेत. त्यांनी वझााहत मिर्झा यांना धावबाद केले.

मिर्झा यांच्यानंतर झिशान सिद्दीकी फलंदाजीला आले. पोलार्डच्या तिसऱ्या षटकावरही जबरदस्त फटके मारत धावसंख्या जबरदस्त वाढविली. तिसरं षटक संपलं तेव्हा धावसंख्या 1 बाद 49 होती.

चौथ्या षटकात तुषार दलाल यांच्या चेंडूवरही झिशान आणि सलमान यांनी धावांचा वर्षाव कायम ठेवला. एक, दोन धावा काढायच्या नाही असा जणू त्यांनी चंगच बांधलेला दिसला. मात्र अशातच सलमान सुफी धावबाद झाले. पोलार्डनी त्यांना तंबूत पाठवलं. चौथ्या चषटकाच्या समाप्तीपर्यंत 2 बाद 68 धावा काँग्रेसच्या होत्या.

अखेरचं षटक मन्नु जोहर यांनी टाकलं. विनित तोडकर आणि झिशान यांनी गॅप पाहात चेंडू त्या दिशेने टोलवले. काँग्रेसचा डाव 2 गडी बाद 81 धावांवर आटोपला.

Shivsena Vs Congress
Cricketnama 2023 : नागपुरात नाना पटोलेंना फटका बसणार की शिंदे गट हवा करणार?

शिवसेनेच्या (शिंदे गट) सलामीसाठी पोलार्ड बाजवा आणि प्रवेश आसुदानी यांना पाठवलं. त्यांनी विनोद तोडकर यांच्या पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला. शिवसेना सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिकेत होती. झिशान सिद्दीकी यांच्या चेंडूवर प्रवेश हे त्रिफळाचित झालेत. त्यानंतर मन्नु जोहर आले व लगेचच झेलबाद झाले. त्यानंतर हॅट्‌ट्रिक करीत झिशान यांनी मन्नु यांनाही तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर तुषार दलाल शिंदे गटाकडून मैदानात आले. तोवर 3 गडी बाद 32 अशी धावसंख्या शिवसेनेची होती. 18 चेंडूत 50 धावा शिवसेनेला विजयासाठी हव्या होत्या.

Shivsena Vs Congress
Cricketnama 2023 : राष्ट्रवादीच्या संघाला नमवत काँग्रेसची अंतिम सामन्यात धडक!

मारवान कादरी यांच्या तिसऱ्या षटकात मात्र पोलार्डनं प्रहार केले. 13 चेंडूत 44 धावा त्यावेळी गरजेच्या होत्या. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीच्या वेळी 13 धावांचा रनरेट गरजेचा होता. चौथं षटक झिशान यांनी आपल्याकडं घेतलं. परंतु पोलार्डनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. 10 चेंडूत 33 धावांची गरज शिवसेनेला होती. अशातच पोलार्डनी दोन षटकार हाणले. पोलार्डनं व्यूहरचना करीत शेवटच्या षटकात स्ट्राइक आपल्याकडे घेतली.

Shivsena Vs Congress
Cricketnama 2023 : 'क्रिकेटनामा'च्या अंतिम सामन्यांसाठी मैदान खचाखच भरले; टाळ्या, शिट्ट्या अन् पिपाण्यांचा आवाज घुमला

6 चेंडूत 19 धावा त्यावेळी गरजेच्या होत्या. अमीर यांनी गोलंदाजी सुरू केली. 4 चेंडूत 19 धावा असताना पोलार्डच्या चेहऱ्यावर दबाव दिसत होता. अमीर यांचे दोन डॉट बॉल टाकून झाले होते. त्यानंतर पोलार्डनी चौकार ठोकला. तरीही 2 चेंडूत 15 धावांचे लक्ष्य होतं. पुन्हा पोलार्डनी चौकार लगावला. पण 1 चेंडूत 11 धावा अशक्य होत्या. त्यामुळं काँग्रेस ‘क्रिकेटनामा’च्या दुसऱ्या सीझनचे विजेते ठरले. शिवसेनेचे पोलार्ड 51 धावांवर नाबाद राहिले. नीलेश नातू आणि आकाश मांजरेकर यांनी सामन्याचं सूत्रसंचालन व समालोचन केलं.

जिंकताच पटोले थिरकले

काँग्रेसच्या टीमने ‘क्रिकेटनामा’ चषक जिंकल्यानंतर मैदानात जल्लोष सुरू झाला. त्यावेळी बाबा सिद्दीकी आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनीही डीजेच्या तालावर ठेका धरला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com