नागपूर : आम्ही कुणाच्याही पाठीत खंजीर खुपसला नाही, तर शिवसेनेनेच आमच्या पाठीत खंजीर खुपसला, असे म्हणत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी गोव्यात केलेल्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.
आमच्यासोबत (BJP) निवडणूक लढवून त्यांनी महाराष्ट्रभर मते मागितली आणि ऐन सत्तास्थापनेच्या वेळी दगाफटका करून कॉंग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससारख्या (NCP) विचारधारा न पटणाऱ्या पक्षांसोबत जाऊन सत्ता मिळविली. केवळ मुख्यमंत्र्याची खुर्ची येवढेच त्यांचे लक्ष्य होते, तर राज्याचा विकास हे आमचे लक्ष्य होते. हा दगाफटका करून शिवसेनेने केवळ आमच्याच पाठीत खंजीर खुपसला नाही, तर महाराष्ट्रातील जनतेशीसुद्धा बेईमानी केली आहे. कारण जनतेचा कौल भाजप-शिवसेनेला होता. तो शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी नव्हता. आम्ही तेव्हाही आमच्या शब्दावरून फिरलो नाही, अन् आताही नाही, असे रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) म्हणाले.
भाजप नेते महाविकास आघाडीच्या नेत्यांना टारगेट करत असल्याचा आरोप केला जातो, याबाबत छेडले असता दानवे म्हणाले की, आम्ही कुणाच्याही वाट्याला जात नाही. कायदा त्याचे काम करत असतो, त्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करीत नाही. त्यांची कृत्य जशी आहेत, तशीच फळ त्यांना मिळत आहेत. त्यासाठी आम्हाला दोषी धरणे कदापिही योग्य नाही. आम्हाला बोलण्याच्या आधी त्यांनी आपले आचरण सुधारावे. आम्ही जाणीवपूर्वक काहीही करीत नाही. आम्ही आमच्या शब्दावर तेव्हाही ठाम होतो आणि आजही आहोत, असे ते म्हणाले.
विदर्भाला भरभरून दिले..
रेल्वेमध्ये यापुढे डबाबंद अन्न दिले जाणार नाही, तर तेथे शिजविलेले अन्न प्रवाशांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यासाठीचे नियोजन झालेले आहे. देशातील ८० कोटी लोकांना मोफत धान्य देण्याचे सरकारचे नियोजन आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार रुपये जमा केले जाणार आहेत. केंद्र सरकारने विदर्भालाही भरभरून दिलेले आहे. वर्धा नांदेड रेल्वे मार्गासाठी ३००० कोटी, वर्धा बल्लारशासाठी १८०० कोटी, वर्धा नागपूरसाठी ६०० कोटी आणि नागपूर नागभीडसाठी ११४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.