Nagpur Politics : माझे आयुष्यही नितीन गडकरी यांना मिळो... कोण म्हणालं असं?

Nitin Gadkari : खासदार सांस्कृतिक महोत्सवात दत्ता मेघे यांनी व्यक्त केली भावना
Nitin Gadkari & Datta Meghe
Nitin Gadkari & Datta MegheSarkarnama
Published on
Updated on

Khasdar Sanskrutik Mohatsav : ‘ माझे वय आता 88 वर्षांचे आहे. आता माझ्याकडे फार वेळ नाही. केवळ आणखी दोन वर्षे जगण्याची तेवढी इच्छा आहे. माझे उर्वरित जे आयुष्य असेल ते नितीन गडकरी यांना मिळो. नितीन गडकरी भविष्यात देशाचे पंतप्रधान व्हावे अशी इच्छा आहे’, हे भावनिक उद्गार आहेत माजी खासदार दत्ता मेघे यांचे.

नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा शुभारंभ झाला. त्यावेळी माजी खासदार दत्ता मेघे बोलत होते. दरवर्षी नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपुरात खासदार क्रीडा महोत्सव, खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदाही हे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (ता. 19) यानिमित्ताने सप्तसुरांची मैफल सजली.

Nitin Gadkari & Datta Meghe
Nagpur Zilla Parishad : फायली रोखण्याचा मुद्दा गाजला स्थायी समितीच्या बैठकीत

गायक महेश काळे यांनी एकापेक्षा एक सरस गीत सादर केले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात माजी खासदार दत्ता मेघे यांनी भावनिक भाषण देत नितीन गडकरी यांना पंतप्रधानपदी जाण्यासाठी शुभेच्छाही दिल्या. माजी आमदार प्रा. अनिल सोले. ‘वैद्यनाथ’चे व्यवस्थापकीय संचालक सुरेश शर्मा, सीए ब्रजकिशोर अग्रवाल, डॉ. सुभाष देशमुख, ज्येष्ठ साहित्यिक आशा पांडे, आदर्श शिक्षिका विभावरी कुळकर्णी, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, माजी आमदार नागो गाणार, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, माजी आमदार अशोक मानकर, ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे राजू मिश्रा यावेळी उपस्थित होते.

माजी खासदार दत्ता मेघे यांच्या भाषणाने खासदार सांस्कृतिक महोत्सवातील वातावरण चांगलेच भावनिक झाले. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या शैलीत दत्ता मेघे यांचे आभार मानले. पंतप्रधान पदाबाबत कोणतेही भाष्य त्यांनी करणे टाळले. परंतु दत्ता मेघे यांच्या शुभेच्छांसाठी गडकरी यांनी त्यांनाच दीर्घायुष्य लाभावे अशी प्रार्थना केली. गडकरी म्हणाले, ‘दत्ता मेघे हे वयाची शंभरी पूर्ण करतील. आपण सर्व ज्या ठिकाणी खासदार सांस्कृतिक महोत्सव होत आहे, त्याच सभागृहात मेघे यांच्या शतकपूर्तीचा कार्यक्रम साजरा करू.’

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दत्ता मेघे आणि नितीन गडकरी यांनी एकमेकांना दिलेल्या शुभेच्छा आणि मेघे यांनी उल्लेख केलेले पंतप्रधानपद यामुळे पुन्हा एकदा गडकरींच्या नावाभोवती चर्चेचे वलय तयार झाले आहे. केंद्र सरकार आणि भाजपमधील सगळ्यात ‘सिनीअर’ लोकांच्या यादीत गडकरी यांचा नंबर लागतो. अशात मेघे यांनी आपल्या भावना प्रामाणिकमपणे व्यक्त केल्याची चर्चा खासदार सांस्कृतिकम महोत्सवाच्या कार्यक्रमस्थळी होती.

Edited By : Prasannaa Jakate

Nitin Gadkari & Datta Meghe
Nagpur Congress : महाविकास आघाडीच्या जागावाटपाचे काम पूर्णत्वाकडे...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com