Nana Patole : नाना पटोले यांच्याविरोधातील 'नाराजी'पत्राची हायकमांड दखल घेणार का? प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी दिसून येत आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात नाराज गट सक्रिय होत आहे.
Mallikarjun Kharge, Nana Patole, Rahul Gandhi
Mallikarjun Kharge, Nana Patole, Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Congress Political News :

लोकसभा निवडणुकीला अवघे दोन-अडीच महिने शिल्लक आहेत. अशातच काँग्रेसला गळली लागली आहे. काँग्रेसचे मोठे नेते बाहेर पडत आहेत. अशोक चव्हाण, बाबा सिद्दीकी, मिलिंद देवरा अशा अनेक नेत्यांनी काँग्रेसला 'हात' दाखवला आहे. या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात नागपुरातील नाराज गट सक्रिय झाला आहे. त्यांनी गेल्या महिन्यात थेट हायकमांडला पत्र लिहून पटोलेंना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये पुढे काय होणार, याची उत्सुकता सर्वांना लागून राहिलेली आहे.

Mallikarjun Kharge, Nana Patole, Rahul Gandhi
Nana Patole News : ‘या’ कारणांनी होतोय नाना पटोलेंना काँग्रेसमध्ये विरोध !

काँग्रेस हायकमांड लोकसभा निवडणूक (Loksabhe Election) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली लढण्याच्या तयारीत आहे. दुसरीकडे काँग्रेसमध्ये नाना पटोले (Nana Patole) यांच्या विरोधात अंतर्गत नाराजी पाहायला मिळत आहे. पटोलेंविरोधातील तक्रारी सातत्याने तक्रारी दिल्ली दरबारी नेऊन हायकमांडपर्यंत पोहचवल्या जात आहेत. तरीही राज्यात भाजपच्या (BJP) विरोधात आपणच कॉंग्रेसला बळकट करू शकतो, हे पटवून देण्यात नाना पटोले यशस्वी होताना दिसून येत आहेत.

सगळेच पक्ष लोकसभा निवडणुकीसाठी पक्ष मजबूत करण्यावर भर देत असताना काँग्रेसला (Congress) गळती लागल्याचे दिसून येते. आणि त्याचवेळी नाना पटोले यांच्याविरोधात नागपूरमधील एक नाराज गट सक्रिय झाला आहे. महत्त्वाची पदे नाना पटोले त्यांच्या जवळच्या लोकांना देत आहेत आणि निष्ठावंतांना डावलत आहेत, असा त्यांच्यावर आरोप केला जात आहे.

काँग्रेसश्रेष्ठींना पत्र

हा रोष मागील महिन्यात हायकमांडला पत्र पाठवून समोर आला. त्यात प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांना वर्ध्यातून उमेदवारी देण्याची मागणी पत्रातून करण्यात आली. तसेच नाना पटोले यांच्या प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्यासाठी मागणी करण्यात आली होतीय.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेस सोडल्याने पुन्हा प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंविरोधात असंतोषाची भावना समोर येत आहे. काँग्रेसचे लोणावळ्यात चिंतन शिबीर झाले. यात काँग्रेसच्या सचिवांना न बोलावल्याने ही नाराजी प्रभारी रमेश चेनिथला (Ramesh Chennithala) यांच्यापर्यंत पोहचवण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकांना सामोरे जाताना सचिवांना डावलणे, केवळ जवळच्या लोकांचा मह्त्त्वाची पदे देणे यामुळे पटोलेंविरोधात नाराजीची चर्चा आहे. जुने पदाधिकारी केवळ सतरंजी उचलण्यासाठीच आहे का, असा काही जणांचा दबक्या आवाजातील सूर बाहेर पडत आहे.

एकजुटीने लढल्यास निवडणूक जिंकता येईल. पण, प्रदेशाध्यक्ष संघटनेतील सर्वांना सोबत घेऊन चालत नाहीत, अशी नाराजी अल्पसंख्याक समूहातील पदाधिकारी करत आहे. नाराजांची नाराजी वेळीच दूर न केल्यास ऐन निवडणुकीच्या काळात काँग्रेससमोरील अडचणी वाढू शकतात, याकडे लक्ष वेधले जात आहे.

(Edited by Avinash Chandane)

Mallikarjun Kharge, Nana Patole, Rahul Gandhi
Ashok Chavan-Nana Patole : अशोक चव्हाणांच्या जाण्याने नानांना वेदना? छेडली दर्दभरी गझल...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com