Ashok Chavan-Nana Patole : अशोक चव्हाणांच्या जाण्याने नानांना वेदना? छेडली दर्दभरी गझल...

Congress Lonawala Workshop : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे दोन दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबीर लोणावळ्यात पार पडले.
Ashok Chavan and Nana Patole
Ashok Chavan and Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

Congress Political News : माझे मूळ काँग्रेस असून कधीही पक्ष सोडणार नाही, असे म्हणत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी हातात कमळ घेतले. अशोक चव्हाण काँग्रेस सोडून भाजपची साथ दिल्याने राजकीय वर्तुळातून भुवया उंचवल्या. तर काँग्रेसच्या गोटातही अस्वस्थता निर्माण झाली. नांदेडमध्ये तर काँग्रेसचे कार्यकर्ते सैरभैर झाल्याची स्थिती आहे. यातच लोणावळ्यातील शिबिरात प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी 'तू इस तरह से मेरी ज़िंदगी में शामिल है' हे गाण गायले. यातून अधिवेशनात चव्हणांची कमी जाणवल्याची कुजबूज सुरू होती.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे दोन दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबीर लोणावळ्यात पार पडले. या शिबिराचे उदघाटन राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. या प्रशिक्षण शिबिरात महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान, पटोलेंनी गायलेल्या गाण्याची चर्चा होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ashok Chavan and Nana Patole
Chandrakant Khaire : ...म्हणूनच जलील काढतायत पळ; चंद्रकांत खैरेंनी साधले टायमिंग

लोणावळ्यात शुक्रवारी सायंकाळी एका सत्रात काँग्रेस नेत्यांच्या टीमने गाणे गायले. या गाण्यात नाना पटोलेही (Nana Patole) सहभागी होते. ते गाणं होते 'तू इस तरह से मेरी ज़िंदगी में शामिल है...' हे गाणं गाताना काँग्रेस नेत्यांचा सूर हरपला होता. संगीत एकीकडे तर शब्द दुसरीकडे, अशी गत पटोलेंच्या टीमची झाली होती. आता हा या गाण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रया दिल्या आहेत. अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडल्याने काँग्रेसचा सूर हरवल्याचे काही जणांनी म्हटले आहे. तर आठवण झाली. काँग्रसला आता चव्हाणांचा विरह सहन होत नसल्याचेही बोलले गेले.

अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी अचानक काँग्रेसच्या सदस्य पदाचा आणि आमदाराकीचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. प्रवेशानंतर लगेचच त्यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिली. राज्यसभेत ते बिनविरोध निवडून आले आहेत. दरम्यान, पंकजा मुंडे, नारायण राणे यांना टाळून भाजपने चव्हाणांना राज्यसभेची संधी दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Ashok Chavan and Nana Patole
Rahul Gandhi : राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर टीका करताना का घेतले अमिताभ बच्चन, ऐश्वर्या रॉयचे नाव ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com