Devendra Fadnavis On Raut : '' सकाळी 9 वाजता टीव्ही लावला की...''; फडणवीसांचा राऊतांना मिश्किल टोला

Maharashtra Politics : ...पण राजकारणात आमच्यातलाही साहित्यिक ओसंडून वाहत असतो.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Sarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadnavis Latest News : ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत हे भाजपसह शिंदे गटावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या विविध मुद्द्यांवर राऊत टीका करत असतात. मात्र, याच पार्श्वभूमीवर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांना (Sanjay Raut) मिश्किल टोला लगावला आहे. तसेच विदर्भ साहित्य संघाला 10 कोटी रुपये देण्याची घोषणाही फडणवीस यांनी यावेळी केली आहे.

देवेंद्र फडणवीस हे वर्धा येथील 96व्या मराठी साहित्य संमेलनाला उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, साहित्याच्या व्यासपीठावर राजकारणी काय करतात असा प्रश्न नेहमी विचारला जातो. पण आम्ही राजकारणी साहित्यिकांची प्रेरणा आहे. कारण आमच्यातील अनेक राजकारणी कवी आहेत, कथाकार आहेत. तसेच आम्ही नसतो तर व्यंगचित्रं कुणावर काढली असती असा सवालही उपस्थित केला.

याचवेळी राजकारणात आमच्यातलाही साहित्यिक ओसंडून वाहत असतो. सकाळी 9 वाजता टीव्ही लावला की, आमच्यातील साहित्य ओसंडून वाहतं असा टोला फडणवीसांनी राऊतांना लगावला. त्यामुळं थोडी जागा आम्हांला मिळाली की, ती थोडीशी जागा कशी व्यापून टाकायची ते आम्हांला चांगलं जमतं असंही देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) म्हणाले.

Devendra Fadnavis
Narendra Chapalgaonkar : संमेलनाध्यक्ष चपळगावकरांना पोलिसांना अडवलं ; "आम्ही मारेकरी दिसतो का..?

सोशल मीडियामुळं नवीन माध्यमं तयार झालं आहे, मात्र, त्याला उंची आणि खोली नाही.पुस्तके आपल्यापर्यंत साहित्य पोहचवतात.इतकी साहित्य संमेलनं होतात. पण ही सगळी साहित्य संमेलनं साहित्याला, विचारला समृद्ध करतात. त्यामुळं साहित्य परंपरा महत्त्वाची आहे.साहित्य संमेलन उणिवा नाही तर जाणीवा सांगणारे असते.

Devendra Fadnavis
Chandrakant Khaire News : `चांगली गोष्ट आहे`, जाधवांच्या पाठिंब्यावर खैरेंची सावध प्रतिक्रिया..

पराभवाच्या भीतीनं निवडणुका बिनविरोध...

कसबा, चिंचवड पोटनिवडणुका बिनविरोध करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न वाखाणण्यासारखे आहेत. मात्र, महाराष्ट्राचं राजकारण कोणी गढूळ केलं हेही लक्षात घ्यायला हवं. देवेंद्र फडणवीस यांनीही हे मान्य करून कटुता संपविण्यासाठी, वातावरण चांगलं होण्यासाठी पुढाकार घेणार असं सांगितलं जातं. मात्र, पुढे तसे कोणतेही प्रयत्न का झाले नाही असा सवाल संजय राऊतांनी विचारला आहे.

नांदेड, पंढरपूरमध्ये भाजपने परंपरा पाळली नाही. आता पराभवाच्या भीतीनं निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन करण्यात येत आहे असा टोलाही संजय राऊतांनी शिंदे फडणवीसांना लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com