Devendra Fadnavis : फडणवीसांनी केले भाजप आमदारांना अलर्ट

Devendra Fadnavis Ready for Vidhan Sabha Election : आता विधानसभेच्या निवडणुकीतही विरोधक संविधानासोबतच आरक्षणावर भर देणार असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या सर्व आमदारांना आधीच अलर्ट केले आहे.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

BJP Agenda for Vidhansabha Election : लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने निर्माण केलेल्या संविधान बदलणार या नॅरेटिव्हने भाजप आघाडीला मोठा फटका बसला होता. आता विधानसभेच्या निवडणुकीतही विरोधक संविधानासोबतच आरक्षणावर भर देणार असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या सर्व आमदारांना आधीच अलर्ट केले आहे.

त्यासाठी सर्व आमदारांना वेगवेगळ्या जिल्ह्यात पाठवून नागरिकांच्या भेटीगाठी, सामाजिक, धार्मिक, बौद्धिक क्षेत्रातील लोकांना विश्वासात घेऊन भाजपचे म्हणणे, धोरण पटवून देण्याची जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या सोबतीला विस्तारक आणि संबंधित जिल्ह्याचे अध्यक्ष राहणार आहेत.

आगामी दोन महिन्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. महाराष्ट्रात महायुतीच्या विरोधात वातवरण असल्याचे नेत्यांना दिसू लागले आहे. त्यामुळे लाडकी बहिणीसोबत भरमसाठ वैयक्तिक लाभाच्या योजना जाहीर केल्या जात आहे.

एवढ्याने भागणार नसल्याने आमदार व कार्यकर्त्यांना वैयक्तिक प्रयत्नसुद्धा करावे लागणार आहे. दोन दिवसांपासून फडणवीस यांनी देवगिरी बंगल्यावर सर्व विदर्भाच्या आमदारांची (Vidarbha MLA) बैठक घेतली आणि संभाव्य धोक्याची सूचना दिली.

संविधान बदलणार असल्याने इंडिया आघाडीच्या नॅरेटिव्हने दलित, बैद्ध आणि मुस्लिमांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते. त्यांची एकगठ्ठा मते विरोधकांना पडली होती. त्यामुळे काही चांगल्या खासदारांनाही पराभूत व्हावे लागले.

हीच मोडस ऑपरेंडी आता विरोधक विधानसभेच्या निवडणुकीतही वापरणार आहे. त्यामुळे यास जशास तसे उत्तर देण्यासाठी तयार राहा आणि त्यासाठी काय काय करायचे याचा कार्यक्रमसुद्धा फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आखून दिला आहे.

Devendra Fadnavis
Vijay Wadettiwar Vs Devendra Fadnavis : टक्केवारीत पुढे-पुढे, महायुती सरकारला 'त्यांचा' शाप; वडेट्टीवार यांचा फडणवीस यांच्यावर हल्लाबोल

नॅरेटिव्ह फक्त सोशल मीडियावर पोस्ट टाकून खोडून काढता येणार नाही. लोकांमधील गैरसमज दूर करण्यासाठी प्रत्यक्ष भेटावे लागणार आहे. यासाठी आमदार, जिल्हाध्यक्ष व विस्ताराची एक ग्रुप तयार करा.

आमदाराला दुसऱ्या मतदारसंघाची जबाबादारी सोपवण्यात आली आहे. अशा एकूण हजार बैठका घेण्यात येणार आहे. यात बौद्ध भिक्कू, पुजारी, वेगवेगळ्या समाजाचे पुढारी, संघटनांचे अध्यक्ष, समाजावर प्रभाव टाकणारे डॉक्टर, इंजिनिअर, अधिकारी अशा सर्वांसोबत बैठका घेण्यात येणार आहे.

Devendra Fadnavis
Vijay Wadettiwar Vs Devendra Fadnavis : टक्केवारीत पुढे-पुढे, महायुती सरकारला 'त्यांचा' शाप; वडेट्टीवार यांचा फडणवीस यांच्यावर हल्लाबोल

त्यांना संविधान आणि आरक्षणावर भाजपची भूमिका सांगा, विश्वास पटवून द्या, असे निर्देश फडणवीस यांनी दिले आहे. सोबतच आमदारांना आपले घर आणि कार्यालयाच्या बाहेर पडण्यास सांगण्यात आले आहे.

मोठमोठ्या चारचाकी गाड्यांमधून फिरण्याऐवजी लोकांमध्ये मिसळा, घराघरांमध्ये भेटी द्या असे सांगून आमदार आणि मतदार यामधील अंतर कमी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com