Vijay Wadettiwar Vs Devendra Fadnavis : टक्केवारीत पुढे-पुढे, महायुती सरकारला 'त्यांचा' शाप; वडेट्टीवार यांचा फडणवीस यांच्यावर हल्लाबोल

Wadettiwar angry with Fadnavis over health system in Gadchiroli : गडचिरोलीत ढासळलेल्या आरोग्य व्यवस्थेवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर संताप व्यक्त केला आहे.
Vijay Wadettiwar Vs Devendra Fadnavis
Vijay Wadettiwar Vs Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहे. या जिल्ह्यात आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटर आहे. यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रचार आणि प्रसारावर 270 कोटी रुपये खर्च करत असतानाच गडचिरोतील आरोग्य व्यवस्थेचे काय? टक्केवारीमध्ये पुढे-पुढे करणाऱ्या या ट्रिपल इंजिन सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. आजारी आरोग्य व्यवस्थेमुळे जीव गमावणाऱ्या रुग्णांच्या कुटुंबाच्या वेदना या महायुती सरकारला शाप म्हणून लागतील, असा संताप वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यात एका गर्भवती महिलेला चरवीदंड येथून खाटेची कावड करून पुराच्या पाण्यातून आणि जंगलातील पायवाटेने दोन किलोमीटरपर्यंत लेकुरबोडी गावापर्यंत न्यावे लागले.गर्भवती महिला कशीबशी जिल्हा रुग्णालयात पोचली; पण प्रसूतीनंतर बाळ दगावले. या घटनेमुळे विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी महायुती सरकारचे वाभाडे काढले. गडचिरोलीतील बिघडलेली आरोग्यव्यवस्थेचा किती व्हेंटिलेटरवर गेली, याचे हे उत्तम उदाहरण असल्याचा टोला वडेट्टीवार यांनी फडणवीस यांना लगावला. एकीकडे लाडकी बहीण योजना चालवायची आणि दुसरीकडे याच बहिणीला वाऱ्यावर सोडायचे, असा संताप वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

Vijay Wadettiwar Vs Devendra Fadnavis
Nitin Gadkari News :...तर जनता तुमची हवा उतरवेल; गडकरींनी निवडणुकीपूर्वीच टोचले आमदार, नगरसेवकांचे कान

विजय वडेट्टीवार म्हणाले, "उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पालकमंत्री असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे आजारी पडली असून, ती व्हेंटिलेटरवर आहे. एकीकडे 'लाडकी बहीण' योजनेच्या प्रचार आणि प्रसाराकरीता 270 कोटी रुपये खर्च होत असताना, अशा घटना पुढे येत असल्याने राज्यात आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे".

Vijay Wadettiwar Vs Devendra Fadnavis
Prakash Ambedkar : खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच, स्ट्राईक रेट सांगत प्रकाश आंबेडकरांनी केलं विश्लेषण

गडचिरोलीमधील ढासळलेल्या आरोग्य व्यवस्थेवर भाष्य करताना पाढाच वाचला. कुठे मुलाला आपल्या वडिलांना घेऊन जावे लागते, तर कुठे गरोदर महिलेला कावड करून रुग्णालयात न्यावे लागते.एका मागून एक अशा घटना घडत आहे, पण या सरकारला आणि प्रशासनाला पाझर काही फुटत नाही. फक्त टक्केवारीमध्ये पुढे-पुढे करणाऱ्या या ट्रिपल इंजिन सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. आजारी आरोग्य व्यवस्थेमुळे जीव गमावणाऱ्या रुग्णांच्या कुटुंबाच्या वेदना या महायुती सरकारला शाप म्हणून लागतील, असा संताप विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com