Nagpur Politics: भाजप अन् काँग्रेसची ताकद असूनही बसपाचे 10 नगरसेवक निवडून येतात, 'आरपीआय'चा एकही का नाही?

BJP Vs Congress : एकेकाळी नागपूरमध्ये रिपाई चळवळीचा मोठा धाक होता. उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघातून एकीकृत रिपाइंचे उमेदवार उपेंद्र शेंडे निवडून आले होते. याच मतदारसंघातून बसपाचे अनुक्रम 12 आणि 10 नगरसेवक निवडून आले आहेत.
nagpur corporation.jpg
nagpur corporation.jpgsarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : भाजप आणि काँग्रेस या दोन बड्या पक्षांची ताकद असतानाही नागपूर शहरात बसपाचे 10 नगरसेवक निवडून येतात तर आपले का नाही यावर सध्या सर्व रिपब्लिकन नेत्यांचे मंथन सुरू आहे. आपण वेगवेगळ्या गटात विखुरल्यामुळे ही परिस्थिती ओढावली आहे यावर सर्वांचे एकमत झाले असून आता नागपूर (Nagpur) महापालिकेची आगामी निवडणूक एकीनेच लढण्याच्या सर्वांनी हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी एक वॉर्ड एक उमेदवार असा फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे.

रिपाइंच्या विविध गटांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची नुकतीच एक बैठक नागपूरमध्ये झाली. रिपाइं आठवले, रिपाई गवई, रिपाई खोब्रागडे, जोगेंद्र कवाडे आणि बाळासाहेब आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रमुख पदाधिकारी या बैठकीत होते. या सर्वांनी आपआपल्या प्रमुख नेत्यांना आपला निर्णय कळवला आहे.

तुम्ही केंद्रात आणि राज्यात कोणाही सोबत युती करा किंवा आघाडी करा. मात्र, पक्ष आणि समाजासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा विचार केव्हा करणार, असा सवाल त्यांचा आहे. जे वीस-वीस वर्षांपासून रिपाई जनतेसाठी लढा देत आहेत, रिपब्लिकन चळवळ जिवंत ठेवत आहे. आता त्यांचाही विचार करावा, अशी मागणी केली जात आहे.

रिपाई चळवळ दिवसेंदिवस कमकुवत होत चालली आहे. कोणी काँग्रेस तर कोणी भाजपसोबत जातो. त्यामुळे दिवसेंदिवस रिपाई चळवळ कमजोर होत चालली. आपण एकत्रित लढलो नाही तर रिपाई जनतेची हक्काची मते भाजप (BJP) आणि काँग्रेस विखुरली जातील. परिणामी, चळवळीचे अस्तित्वही धोक्यात येईल अशी भीतीही यावेळी व्यक्त करण्यात आली.

nagpur corporation.jpg
MNS Politics: इकडे उद्धव ठाकरेंसोबतची युती 'वेटिंग'वर; तिकडे मनसेचा बच्चू कडूंंबाबत मोठा निर्णय; बाळा नांदगावकरांची घोषणा

एकेकाळी नागपूरमध्ये रिपाई चळवळीचा मोठा धाक होता. उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघातून एकीकृत रिपाइंचे उमेदवार उपेंद्र शेंडे निवडूण आले होते. याच मतदारसंघातून बसपाचे अनुक्रम 12 आणि 10 नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र, रिपाईचा गड असतानाही एकही नगरसेवक मागील दोन निवडणुकांमध्ये निवडून आला नाही. आजवर झालेली चूक आता यावेळी होणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दूर करावी, अशी मागणी नेत्यांकडे करण्यात आली आहे

प्रकाश आंबेडकर आणि केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी यास मान्यता दिली असल्याचा दावा करण्यात आला. स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक पदाधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याचे समजते. विशेष म्हणजे 2007 च्या निवडणुकीत रिपाई ऐक्यामुळे 13 नगरसेवक आणि 2 स्विकृत नगरसेवक निवडून आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com