Devendra Fadnavis On Ujjwal Nikam : उज्ज्वल निकमांसमोर मस्साजोगचा खटला लढवण्याबाबत 'ही' आहे अडचण? फडणवीसांचं मोठं विधान

CM Devendra Fadnavis on Ujjwal Nikam Entry In Santosh Deshmukh Murder Case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येचा तपास सीआयडी आणि एसआयटी करीत आहेत. देशमुख हत्या तपासाला वेग आला असून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक करा, अशी मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर निकम यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'सागर'बंगल्यावर भेट घेतली.
Devendra Fadnavis On Ujjwal Nikam
Devendra Fadnavis On Ujjwal NikamSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येला आता जवळपास दीड महिना उलटला आहे. या हत्येप्रकरणी होत असलेले खळबळजनक आरोपांनी राजकारणासह संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख,भाजप आमदार सुरेश धस यांनी सुरुवातीपासूनच या प्रकरणाचा खटला ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकमांनी लढवावा अशी मागणी लावून धरली आहे. सरकारकडूनही यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत.अशातच गुरुवारी रात्री (ता.16) उज्ज्वल निकमांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadnavis) भेट घेतली. या भेटीनंतर फडणवीसांनी निकमांच्या संतोष देशमुख हत्येप्रकरणातील 'एन्ट्री'वर भाष्य करताना एक मोठं विधान केलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (ता.17) नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांच्यासोबत गुरुवारी (ता.16) रात्री सागर बंगल्यावर भेटीवेळी झालेल्या चर्चेवर भाष्य केलं.ते म्हणाले,जर तपासयंत्रणांना आपण नीट तपास करु दिला नाही,आणि तपासयंत्रणा सगळ्याच गोष्टी रोज बाहेर येऊन सांगू शकत नाही.तपासावेळी काही गोष्टी गोपनीय ठेवूनच तपास केला जातो.त्यामुळे मला असं वाटतं, की तपासयंत्रणांवर कुठल्याही प्रकारचा दबाव न आणता त्यांना काम करु दिलं पाहिजे, असंही फडणवीस यांनी सांगितलं.

मी एवढं आश्वस्त करु इच्छितो की,कुठल्याही दोषी व्यक्तीला सोडलं जाणार नाही.तपास यंत्रणा योग्यप्रकारे त्यांचं काम करतील.खरंतर मला एका गोष्टीचं दु:खं आहे की, उज्ज्वल निकमांसारखे एक वकील या प्रकरणात आपण नियुक्त करावेत, असे आपले प्रयत्न आहे.त्यांना आपण याबाबत विनंती देखील केली आहे. मला विश्वास आहे की, ते सकारात्मक निर्णय घेतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केला आहे.

Devendra Fadnavis On Ujjwal Nikam
Ajit Pawar Vs Sharad Pawar: पिंपरीत शरद पवारांच्या पक्षाला धक्का देण्यासाठी अजितदादांची मोठी खेळी? 'गुरु-शिष्या'च्या जोडीशी पुन्हा हातमिळवणी

फडणवीस म्हणाले, पण उज्ज्वल निकमांनी बोलताना एक सांगितलं.विनाकारण मला नेमल्यानंतर काही लोक राजकारण करतात.आणि त्याला राजकीय रंग देतात.हे मला योग्य वाटत नाही. मला असं वाटतं,देशामध्ये असे अनेक वकील आहेत,जे वेगवेगळ्या राजकीय पक्षांत आहे, किंवा त्यांनी वेगवेगळ्या पक्षातून निवडणुका लढवल्या आहेत. त्याचं राजकारण होत नाही. पण बीड हत्येप्रकरणी सरकारी वकील म्हणून जबाबदारी घ्यावी याबाबत विनंती उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीवर राजकारण करणं म्हणजे कुठेतरी गुन्हेगारांना मदत करण्यासारखंच आहे, असा हल्लाबोलही मुख्यमंत्र्‍यांनी यावेळी केला.

आजपर्यंतचा उज्ज्वल निकमांचा इतिहास असा राहिला आहे की,त्यांनी एखादी केस घेतली की, गुन्हेगारांना शिक्षाही होतेच. पण आता जर त्यात कुणाला गुन्हेगारांना कुणाला वाचवायचे असेल तर ते उज्ज्वल निकमांना विरोध करतील असंही फडणवीस यांनी सांगत एकप्रकारे विरोधकांनाच फटकारलं आहे.

Devendra Fadnavis On Ujjwal Nikam
Mohite Patil Vs Satpute : सातपुतेंनी दाबली मोहिते पाटलांची दुखरी नस; म्हणाले ‘हा फोटो बघत जा, म्हणजे तुमची लायकी समजेल’

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येचा तपास सीआयडी आणि एसआयटी करीत आहेत. देशमुख हत्या तपासाला वेग आला असून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक करा, अशी मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर निकम यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'सागर'बंगल्यावर भेट घेतली. देशमुख हत्या प्रकरणाचे वकीलपत्र घेण्याबाबत निकम-फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे.

देशमुख हत्येच्या तपासात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक करा, अशी मागणी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि हे प्रकरण लावून धरणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केली आहे. हा खटला चालवण्यासाठी निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्तींची घोषणा लवकरच होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबतची घोषणा प्रशासनाकडून करण्यात येणार आहे.

Devendra Fadnavis On Ujjwal Nikam
Walmik Karad News : धक्कादायक : वाल्मिक कराडवर आरोप केलेल्या कंपनीतील कामगाराचा संशयास्पद मृत्यू

देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुलेसह आठ जणांवर मोक्का लावण्यात आला आहे. विष्णू चाटे याला लातूरच्या कारागृहात हलवण्यात आले आहे. वाल्मिक कराडचे पुण्यात आणखी तीन फ्लॅट असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील हडपसर परिसरात अॅमनोरा सिटीमध्ये त्याचे मध्ये दोन फ्लॅट आहेत. ज्योती जाधव यांच्या नावाने हे फ्लॅट खरेदी करण्यात आले आहेत. ज्योती जाधव ही वाल्मिक कराडची दुसरी पत्नी असल्याचे समजते. एक फ्लॅट हा शरद मुंडे याच्या नावे तर दुसरा फ्लॅट हा ज्योती जाधव यांच्या नावे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com