Mohite Patil Vs Satpute : सातपुतेंनी दाबली मोहिते पाटलांची दुखरी नस; म्हणाले ‘हा फोटो बघत जा, म्हणजे तुमची लायकी समजेल’

Solapur political News : हो, मी माझा पराभव स्वीकारला आहे. मी तर सामान्य घरातला कार्यकर्ता आहे. माझा पराभव थोडक्यात 13 हजारांनी झाला. पण, मोहिते पाटलांचा 2009 ला पंढरपूर विधानसभेत 37 हजार मतांनी दारुण पराभव झाला होता.
Ram Satpute-Dhairyasheel Mohite Patil
Ram Satpute-Dhairyasheel Mohite Patil Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 17 January : लोकसभा निवडणुकीपासून रंगलेला मोहिते पाटील विरुद्ध सातपुते असा सामना आजही तेवढ्याचा ताकदीने लढवला जात आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी बीडचं पार्सल परत पाठवण्याची भाषा करत निवडणुकीपूर्वीच सातपुतेंना इशारा दिला होता. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर सातपुते यांनीही कडक भूमिका घेत मोहिते पाटलांना शिंगावर घ्यायला सुरुवात केली आहे. पंढरपुरात खासदार मोहिते पाटील यांनी ‘राम सातपुते पराभूत आहेत’ असे विधान केले होते. सातपुतेंनीही तेवढ्याच ताकदीने पलटवार केला आहे.

राम सातपुते (Ram Satpute) यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. त्या पोस्टमध्ये राम सातपुते यांनी म्हटले आहे की, काल खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले की, ‘राम सातपुते पराभूत आहेत.’ हो, मी माझा पराभव स्वीकारला आहे. मी तर सामान्य घरातला कार्यकर्ता आहे. माझा पराभव थोडक्यात 13 हजारांनी झाला. पण, मोहिते पाटलांचा 2009 ला पंढरपूर विधानसभेत 37 हजार मतांनी दारुण पराभव झाला होता. (स्व.) भारतनाना भालके यांचा हा फोटो रोज बघत जा, म्हणजे तुमची खरी लायकी लक्षात येईल.

माढा लोकसभा निवडणुकीत भाजपने धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांना तिकिट नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून निवडणूक जिंकली होती. राष्ट्रवादी प्रवेशाच्या कार्यक्रमात धैर्यशील मोहिते पाटील यांनी बीडच पार्सल एका रात्रीत बीडला परत पाठवण्याची आमच्यात धमक आहे, असा इशारा दिला होता. सोलापूर लोकसभा मतदारसंघात राम सातपुतेंच्या विरोधात प्रणिती शिंदे यांना बळ दिले होते.

Ram Satpute-Dhairyasheel Mohite Patil
Maharashtra Ekikaran Samiti : सीमा लढ्याबाबत महाराष्ट्राची भूमिका बदलली काय? महाराष्ट्र एकीकरण समितीचा कोल्हापुरातील आंदोलनात सवाल

मोहिते पाटील विरुद्ध राम सातपुते यांच्यातील खरा सामना हा विधानसभेत दिसला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि मोहिते पाटील यांच्याकडून उत्तम जानकर यांनी निवडणूक लढवली. त्या निवडणुकीत जानकर यांनी राम सातपुते यांचा १३ हजार १४७ मतांनी पराभव केला आहे. विधानसभेचा मार्ग अवघ्या १३ हजार मतांनी अडल्याने सातपुते हे मोहिते पाटील यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत.

सातपुते यांनी विशेषतः आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याविरोधात आक्रमक धोरण घेतले आहे. निवडणुकीत त्यांनी पक्षाच्याविरोधात काम केल्याने त्यांना पक्षातून काढून टाकावे, अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे. मात्र, भाजपकडून रणजितसिंह यांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली आहे. मात्र, त्यांचे पीए यांची बदली, संस्थांमधील गैरव्यवहार, कारखाना विक्री, या माध्यमातून सातपुते हे रोजच मोहिते पाटील यांच्या विरोधात लढत आहेत.

Ram Satpute-Dhairyasheel Mohite Patil
Shirdi Lok Sabha : ठाकरे गटाचा शिर्डी लोकसभेसाठी उमेदवार ठरला; बडा मासा गळाला, काँग्रेसचेही बळ मिळणार

दरम्यान, धैर्यशील मोहिते पाटील यांनी पंढरपुरात बोलताना राम सातपुते हे पराभूत आहेत. पराभूत लोक विकास कामांमध्ये लुडबूड करत आहेत, असे विधान केले होते. त्याला आज सातपुते यांनी प्रतिउत्तर दिले आहे. त्यात त्यांनी मोहिते पाटलांची दुखरी नस दाबली असून पंढरपुरातील पराभवाची कटू आठवण करून देताना त्यांची लायकी काढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com