Devendra Fadnavis News : अधिकाऱ्यांची मोठी चूक; सरकारमधून मोकळं करा म्हणणाऱ्या फडणवीसांना 'कोनशिले'वरुनच केलंं गायब

Gosekhurd Dam tourism Bhoomipujan : भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द येथे महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभाग आणि जलसंपदा विभागाच्या वतीने संयुक्तरित्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Bhandara News : लोकसभेतील अपयशाची जबाबदारी घेत महायुतीचे सर्वेसर्वा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला सरकारमधून मुक्त करावं असं विधान करुन राज्यात खळबळ उडवून दिली होती.

त्यानंतर अनेक राजकीय घडामोडी घडल्या. यात दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी फडणवीसांची विनंती तर फेटाळलीच शिवाय सत्तेत कायम राहण्याची सूचना केली. पण आता याच फडणवीसांसोबत आणखी एक 'योगायोग' जुळवून आला आहे.

गोसीखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमध्ये महत्त्वकांक्षी जलपर्यटन प्रकल्पाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोमवारी (ता.24) भूमिपूजन करण्यात आलं.यावेळी लावण्यात आलेल्या भूमिपूजनाच्या कोनशिलेवर उपमुख्यमंत्री आणि जलसंपदामंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं नाव कुठेही नसल्यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द येथे महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभाग आणि जलसंपदा विभागाच्या वतीने संयुक्तरित्या या महत्वकांशी प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी जल पर्यटन प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी लावण्यात आलेल्या कोनशिलेवर जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच विसर पडला की काय असा सवाल उपस्थित केला जात आहेत.यावरुन नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

Devendra Fadnavis
Narendra Modi Oath : नरेंद्र मोदींनी घेतली शपथ, विरोधकांनी दाखवले संविधान; सभागृहाबाहेरही आंदोलन

वैनगंगा नदीवर जागतिक दर्जाच्या जल पर्यटन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. यावेळी भूमिपूजनाच्या कोनशिलेवर भंडाराचे पालकमंत्री म्हणून विजयकुमार गावित,उद्योग मंत्री म्हणून उदय सामंत, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल,काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,नवनिर्वाचित खासदार प्रशांत पडोळे यांच्यासह अनेक नेत्यांचे नावं फलकावर होते.मात्र,उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री आणि भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव कार्यक्रमाच्या कोनशिलेवर दिसून आले नाही.

Devendra Fadnavis
Praniti Shinde : संसदेच्या पायऱ्या चढताना प्रणिती शिंदे भावूक झाल्या; जुने संसद भवन हवे होते..!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com