Sharad Pawar Retirement : शरद पवारांच्या निर्णयानंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले...

Devendra Fadnavis : शरद पवारांची पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा
Devendra Fadnavis, Sharad Pawar
Devendra Fadnavis, Sharad PawarSarkarnama

Sharad Pawar and Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठी घोषणा केली आहे. आपण लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच राज्यसभेची ही टर्म संपली की आपण या पुढे निवडणूक लढणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी त्यांना निर्णय मागे घेण्याची विनंती केली. यावेळी नेत्यांसह कार्यकर्त्यांना अश्रू अनावर आले. दरम्यान, शरद पवारांच्या निर्णयावर भाजप नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Devendra Fadnavis, Sharad Pawar
Sharad Pawar Resigns As NCP Chief : शरद पवारांनी निर्णय मागे घेण्याच्या मागणीसाठी उपोषण; कार्यकर्ते भावूक..

शरद पवार यांनी घेतलेल्या निर्णयामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी भावना व्यक्त केली. ते म्हणाले "राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिकेवर लक्ष आहे. पवार यांनी घेतलेला निर्णय हा त्यांच्या पक्षातील अंतर्गत विषय आहे. मात्र पवारसांहेबांसरखा अनुभवी, ज्येष्ठ नेत्याने अशा पद्धतीने अचानक राजीनामा देणे ही खटकणारी बाब आहे. तर राष्ट्रवादी पक्षाच्या समतीने त्यांचे मनपरिवर्तन करावे."

Devendra Fadnavis, Sharad Pawar
Sharad Pawar Retirement News : पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर धाराशिव, बुलडाण्याच्या राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांचा राजीनामा

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर (Nagpur) दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी शरद पवारांचा निर्णय हा वयक्तिक असल्याचे सांगितले. फडणवीस म्हणाले, "निवृत्ती घेण्याचा शरद पवारांचा निर्णय वैयक्तिक आहे. ही बाब राष्ट्रवादी पक्षातील अंतर्गत आहे. त्यामुळे आताच त्यांच्या निर्णयावर आणखी काही बोलणे उचित राहणार नाही. आता वाट पाहणेच योग्य आहे. यापुढे त्यांच्या भूमिकेवर लक्ष देऊन आहेत. त्यांनी हा निर्णय का घेतला? त्याची पार्श्वभूमी काय? हे समजून घेतल्यावरच बोलणे योग्य राहील."

Devendra Fadnavis, Sharad Pawar
Sharad Pawar Retirement News: मोठी घडामोड! शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर उध्दव ठाकरे 'सिल्व्हर ओक'ला जाणार...

यावेळी फडणवीस यांनी पुस्तक लिहणार असल्याचेही जाहीर केले. तसेच पहाटेच्या शपथविधीवरून सूचक वक्तव्यही फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. फडणवीस म्हणाले," शरद पवारांचे पुस्तक वाचले नाही. त्यावर काही बोलणार नाही. आता मीही एक पुस्तक लिहिणार आहे. ते योग्य आली की लिहील. त्यावेळी शरद पवारांनी त्यांच्या पुस्तकात नेमकं काय म्हटले, मला काय म्हणायचे आहे आणि सत्य काय आहे, अशा ज्या अनेक गोष्टी आहेत त्या माझ्या पुस्तकातून निश्चित समजतील."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com