
Devendra Fadnavis and Vijay Wadettiwar News : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मंत्री करायचे किंवा नाही याचे अधिकार राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे असताना विरोधकांच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले जात असल्याचं दिसत आहे.
माजीविरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार(Devendra Fadnavis) यांनी, ओबीसींचे नेते असल्याने भुजबळांवर अन्याय केला असल्याचा आरोप फडणवीसांवर केला आहे. फडणवीस यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा राग आमच्यावर काढू नका, असे सांगून वडेट्टीवारांच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिले आहे.
मंत्रिमंडळाचा विस्तार होताच महायुतीमध्ये वादाला तोंड फुटले आहे. अनेकांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar) यांनाही भाजपने मंत्रिमंडाळातून डच्चू दिला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अनुपस्थित राहून त्यांनी आपला राग अप्रत्यक्ष व्यक्त केला. सोबतच केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. ते नाराज नसल्याचे माध्यमांसमोर सांगत असले तरी त्यांचा फडणवीस यांच्यावरील राग लपून राहिला नाही. यातच आता विरोधकांनी छगन भुजबळ यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन फडणवीस यांच्यावर फैरी झाडणे सुरू केले आहे.
विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना फडणवीस म्हणाले, ओबीसींवर बोलण्याचा काँग्रेसला अधिकार नाही. त्यांनी ओबीसींवर कायमच अन्याय केला. राज्यातील पहिले ओबसी मंत्रालय माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात स्थापन झाले. ओबीसी समाजाकरिता ४८ जीआर महायुतीच्या सरकारने काढले. महाज्योतीची स्थापना केली, ५२ ओबीसी वसतिगृह, ओबीसींसाठी पीएचडी तसेच विदेशी शिक्षणाची व्यवस्था आम्ही केली आहे.
ओबीसींना(OBC) संवैधानिक दर्जा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. त्यांना वैद्यकीय शिक्षणातील आरक्षण मोदींनी दिले. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सर्वाधिक ओबीसी मंत्री आहेत याकडे फडणवीसांनी लक्ष वेधले. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात वडेट्टीवार हे ओबीसी खात्याचे मंत्री होते. त्यांनी ओबीसींसाठी काय केले सांगावे? वास्तविक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांच्या सुप्त स्पर्धा आहे. मतभेदही आहेत. पटोले यांनीच त्यांच्यावर अन्याय केला. त्याचा राग ते आमच्यावर काढत असल्याचा टोलाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.