Devendra Fadnavis on Mungantiwar : मुनगंटीवार नाराज असल्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांचं सूचक विधान, म्हणाले...

Sudhir mungantiwar News : सुधीर मुनगंटीवारांचं नाव अखेरच्या क्षणी मंत्रिपदाच्या यादीतून काढण्यात आल्याचं समोर आलं आहे.
Devendra Fadnavis on Mungantiwar
Devendra Fadnavis on MungantiwarSarkarnama
Published on
Updated on

BJP and Sudhir Mungantiwar News : महायुतीच्या देवेंद्र फडणवीस 3.0 सरकारचा शपथविधी काल(रविवार) नागपुरात पार पडला. मात्र या शपथविधी सोहळ्यात काही चर्चेतील ज्यांना मंत्रिपद मिळणार अशी सर्वांनाच खात्री वाटत होती, अशी काही नावे न दिसल्याने सर्वांनाच धक्का बसला. त्यातील एक नावा भाजपचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते सुधीर मुनगंटीवार यांचंही आहे.

विशेष म्हणजे शपथविधीच्या एक दिवसआधीपर्यंत तुम्हाला मंत्रिपद मिळणार असं मुनगंटीवार यांना पक्ष श्रेष्ठींकडून सांगितलं गेलं होतं. मात्र शेवटच्या क्षणी त्यांचं नाव मंत्रिपदाच्या यादीतून गायब झाल्याने, त्यांना मोठा धक्का बसला. शिवाय आज विधिमंडळाच्या कामकाजासही मुनगंटीवार उपस्थित नव्हते, यातूनच मुनगंटीवार हे नाराज असल्याचं बोललं जात आहे. शिवाय, त्यांनी या पार्श्वभूमीवरच केंद्रीयमंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांचीही भेट घेतली आहे. त्यामुळे चर्चांना अधिकच उधाण आलं आहे.

दरम्यान, मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar) यांच्यासारखा ज्येष्ठ नेते नाराज असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्यानंतर आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर मीडियासमोर प्रतिक्रिया दिली आहे. शिवाय, भाजपने ज्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं नाही, त्यामागे पक्षाने काहीतरी विचार केलेला असल्याचंही फडणवीसांनी यावेळी बोलून दाखवलं. फडणवीसांच्या या सूचक प्रतिक्रियेनंतर आता मुनगंटीवार यांना पक्ष संघटनेत कोणतं महत्त्वाचं पद मिळणार याचीही सर्वांना उत्सुकता आहे.

Devendra Fadnavis on Mungantiwar
Sudhir Mungantiwar meet Gadkari : मंत्रिपदाने अखेरच्या क्षणी हुलकावणी दिलेले मुनगंटीवार गडकरींच्या भेटीनंतर म्हणतात, 'मी..'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) म्हणाले, ''माझी सुधीरभाऊंशी नीट चर्चा झालेली आहे. सुधीरभाऊ आमचे ज्येष्ठ नेते आहेत. जसं मी सांगितलं की, पक्षाने काही लोकांना मंत्रिमंडळात न घेण्याच्या पाठीमागे त्यांना काही विशिष्ट जबाबदारी देण्याचा मानस तयार केलेला आहे. शेवटी पक्ष आणि सरकार या दोन्ही गोष्टी आपल्याला चालवायच्या असतात.''

Devendra Fadnavis on Mungantiwar
Mahayuti Cabinet : गडकरी समर्थक असल्याचा खोपडेंना पुन्हा फटका; नाराज शेकडो भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

तसेच ''त्यामुळे काही वेळी सरकारमध्ये काम करणारे पक्षात काम करतात, पक्षात काम करणारे सरकारमध्ये काम करतात. सुधीरभाऊ अतिशय अनुभवी नेते आहेत, महाराष्ट्राचे आमचे अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यामुळे आमच्या केंद्रीय पक्षाने त्यांच्याबाबत काही विचार करूनच मंत्रिमंडळात घेतलेलं नाही.'' असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com