Devendra Fadnavis : 'मुख्यमंत्रि‍पदाबाबत निर्णय अजित पवार, एकनाथ शिंदे घेणार', देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य

Devendra Fadnavis CM Eknath Shinde Ajit Pawar : आम्ही महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढणार आहोत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadnavis News : महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सध्या महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री कोण याची स्पर्धा लागली आहे. दावे-प्रतिदावे केले जात आहे. महायुतीमध्ये मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा कोण? यावर चर्चा सुरू असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावी मुख्यमंत्रि‍पदाच्या चेहऱ्याबाबत आपले मतं सांगितले आहे.

'सध्या आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच आहेत. भावी मुख्यमंत्री कोण राहील, यावर बोलण्याचा आणि निर्णय घेण्याचा अधिकार आपणास नाही', असे सांगून मुख्यमंत्रि‍पदाचा विषय देवेंद्र फडणवीस यांनी पार्लमेंटरी बोर्डाकडे ढकलला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज (शुक्रवारी) नागपूर महापालिकेच्या मुख्यालयात शहरातील प्रमुख प्रकल्पांचा आढावा घेतला.

देवेंद्र फडणीस म्हणाले, 'आम्ही महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढणार आहोत. मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असेल, याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपच्या वतीने पार्लेमेंटरी बोर्ड घेईल. हा विषय माझा नाही आणि माझा अधिकारसुद्धा नाही'.

Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
Video Eknath Shinde : "महायुती सरकारचा कॅप्टन मीच…"; CM शिंदे असं का म्हणाले?

मुख्यमंत्री विधानसभेच्य आधी ठरवायचा की नंतर हा सुद्धा निर्णय तेच घेतली. या विषयावर महायुतीमध्ये कुठलेच मतभेद नाही आणि संभ्रमसुद्धा नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

'मविआ'चा मुख्यमंत्री कोण?

महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा जाहीर करण्याचे आवाहन काँग्रेस, शरद पवार गटाला केले होते. मात्र, शरद पवार यांनी निवडणुकीनंतर ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असे जाहीर केले तर, निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा जाहीर करण्यास काँग्रेसने देखील विरोध केला.

(Edited By Roshan More)

Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
BJP Manifesto : काश्मीरमध्ये 'या' दहा योजना भाजपला मिळवून देणार का सत्ता?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com