Devendra Fadnavis on Mission Nagpur : ‘मिशन नागपूर’साठी देवेंद्र फडणवीसांकडून हालचालींना वेग ; मुंबईत विशेष बैठक!

BJP Nagpur News : ...याचा फडणवीस यांनाही अंदाज आला आहे आणि त्यांनी नागपूर जिल्ह्याकडे आपले लक्ष वळवल्याचे दिसत आहे.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Sarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadnavis and Nagpur District : लोकसभेतील पराभव आणि महायुती सरकारमध्ये वाढत चाललेला असंतोष बघता भाजपा सावध झाली आहे. उपमुख्यमंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रखडलेल्या विविध प्रकल्पासंदर्भात मुंबईत विशेष बैठक बोलावली आहे. ‘मिशन नागपूर’साठी पुन्हा एकदा ते जिल्ह्याकडे लक्ष घालत आहेत.

लोकसभेच्या पराभवाने भाजपाला खडबडून जागे केले आहे. पालकमंत्री असताना फडणवीसांच्या जिल्ह्यातील रामटेकमध्ये महायुतीच्या उमेदवाराचा पराभव झाला. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी जिंकले असले तरी त्यांचे मताधिक्य निम्म्याने घटले आहे. विधासभा मतदारसंघातही भाजपची टक्केवारी घसरली आहे. ही भाजपसाठी धोक्याची घंटा मानली जाते.

Devendra Fadnavis
Chandrashekhar Bawankule : पराभवानंतर बावनकुळे उतरले मैदानात; विधानसभा जिंकण्याच्या दिल्या टिप्स

विधानसभेच्या 2014च्या निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. यात विदर्भाचा सर्वाधिक मोठा वाटा होता. नागपूर शहरातील सर्व सहा जागा भाजपने जिंकल्या होत्या. ग्रामीणमध्ये सहापैकी पाच मतदारसंघात भाजपचे आमदार होते.

देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली होती असे असतानाही 2019 च्या निवडणुकीत चित्र बदलले. शहरातील दोन तर ग्रामीणमधील तीन जागा भाजपने गमावल्या. आता लोकसभेच्या निवडणुकीतसुद्धा पूर्व विदर्भात सहा पैकी नागपूरची एकच जागा भाजपला राखता आली.

येत्या चार ते पाच महिन्यात विधानसभेच्या निवडणूक होवू घातली आहे. मतदारांचा रोष भाजपला परवडणारा नाही. फडणवीस यांनाही याचा अंदाज आला आहे. त्यांनी नागपूर जिल्ह्याकडे आपले लक्ष वळवले आहे. जिल्ह्यातील रखडलेले प्रकल्प विधानसभा निवडणुकीपूर्वी मार्गी लावण्याचा प्रयत्न त्यांचा प्रयत्न दिसतो.

Devendra Fadnavis
Mahayuti Dispute : मंत्रिमंडळ विस्तारानंतर अनेक आमदार महायुतीतून बाहेर पडणार; नागपूरच्या बड्या नेत्याचा दावा

तत्पूर्वी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनीसुद्धा नागपूरमध्ये बैठक घेऊन नागनदीची स्वच्छता व शुद्धीकरण प्रकल्प तसेच ऑरेंज सिटी स्ट्रीट, रस्ते, निर्माणाधीन बाजारपेठ आदी कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांनासुद्धा तंबी देऊन तांत्रिक कारणे पुढे करून कामे रेंगाळ ठेऊ नका अशा सूचना केल्या.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com