Shoumika Mahadik News : 'गोकुळ'मधला वाद चिघळणार ; शौमिका महाडिकांनी केली दहा दिवसांनी भूमिका जाहीर

Kolhapur Gokul Dudh Sangh News : महाडिकांनी सत्ताधाऱ्यांना नेहमीच नजरकैदेत ठेवले...
Satej Patil, Hasan Mushrif, Shoumika Mahadik
Satej Patil, Hasan Mushrif, Shoumika MahadikSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : गोकुळ दूध संघाने गाय दूध खरेदी दरात घट केल्याने जिल्ह्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आणि संताप आहे. त्याचे पडसाद जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात उमटत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या प्रत्येक निर्णयावर बोट ठेवून संघर्ष करणाऱ्या विरोधी महाडिक गटाच्या संचालिका शौमिका महाडिक आहेत कुठे असा सवाल दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे.

जिल्ह्यात लढा सुरू असताना त्याला राजकीय वळण न येण्यासाठी महाडिक यांनी या प्रश्नासंदर्भात अलिप्त भूमिका घेतल्याची चर्चा दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आहे. पण दहा दिवसांनी शौमिका महाडिकांनी आपली भूमिका जाहीर केली आहे.

Satej Patil, Hasan Mushrif, Shoumika Mahadik
Sugarcane FRP News : शेतकरी संघटना आक्रमक; ऐन दिवाळीत शेतकऱ्यांचे शिमगा आंदोलन...रघुनाथ पाटील

गोकुळ दूध संघाने गाय दूध खरेदी दरात कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटले होते. गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांनी गोकुळ दूध संघावर मोर्चाही काढला होता. तर जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्ता रोको, मोर्चाचे नियोजन सुरू झाल्याने दर कपातीचे प्रकरण चिघळणार हे निश्चित होते.

राज्य शासनाने प्रतिलिटर 34 रुपये किमान हमीभाव निश्चित केला आहे. मात्र, गोकुळ उत्पादकांना 33 रुपये देत असल्याने किमान हमीभावाचे काय?असा सवालही शेतकऱ्यांनी केला आहे. गोकुळच्या या निर्णयाविरोधात करवीर, कागल, राधानगरी तालुक्यात पडसाद उमटले होते.सोमवारीही शिरोळ तालुक्यात गोकुळच्या या निर्णयाबद्दल तीव्र आंदोलन करण्यात आले.

महागाईमुळे सामान्य माणसाला जगणे मुश्किल बनले आहे. त्यात गोरगरीब,अल्पभूधारक शेतकरी दूध व्यवसायात आहेत.पशुखाद्य,वैरणीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. दूध व्यवसायातून चार पैसे मिळू लागल्यानंतर आता महागाईमुळे शेतकऱ्यांची कंबरडे मोडले आहे. त्यातच गोकुळने हा निर्णय घेतल्यानंतर गाय उत्पादक शेतकऱ्यांचा असंतोष समोर येत आहे.

गोकुळकडून किमान हमीभाव नियमाची पायमल्ली...

शासनाचा किमान हमीभाव प्रतिलिटर 34 रुपये दर असताना, 33 रुपये दराने संघ दूध घेऊ लागल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या असून, केवळ म्हस दुधावर २० लाख लिटरचा टप्पा पार करणार का? असा सवाल शेतकरी करू लागले आहेत.महागडे पशुखाद्य घालून लिटरभर दूध काढताना शेतक्यांची दमछाक होते. त्यातच गाय दूध खरेदी दरात दोन रुपयांची कपात करून संघाने शासनाची किमान हमीभाव नियमाचे पायमल्ली केली आहे.

Satej Patil, Hasan Mushrif, Shoumika Mahadik
Nana Patole News : माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकरांनी उल्लेख केलेले 'दादा' कोण ? पटोलेंनी ठिणगी टाकली

शौमिका महाडिक काय म्हणाल्या...?

शौमिका महाडिक(Shoumika Mahadik) यांनी तब्बल दहा दिवसांनंतर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्या म्हणाल्या, होय, मी जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसोबतच आहे. मागचे 15 दिवस गोकुळच्या दूध उत्पादकांचे दरासाठी आंदोलन सुरु आहे.

कित्येक दूध उत्पादकांनी मला वैयक्तिक फोन करून आंदोलनात सहभागी होण्यासाठी वेळोवेळी विनंती केली. तरीही मी मौन बाळगले होते. मौन म्हणजे सहमती असा अर्थ कोणीही घेऊ नये. हे मौन बाळगण्याचं कारण काय होतं ? या प्रकरणात नेमकी माझी भूमिका काय ? याबाबत जे सत्य आहे ते उद्या जनतेसमोर निश्चितपणे मांडेन.

Satej Patil, Hasan Mushrif, Shoumika Mahadik
Loksabha Election 2024 : मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचंय, भाजपची ४८ लोकसभा मतदारसंघात तयारी...

तूर्तास मी इतकंच सांगते की, आज होणाऱ्या संचालक मंडळ बैठकीत गाय दूध दरवाढीचा निर्णय सत्ताधाऱ्यांनी घ्यावा. नंतर खोटी कारणं दिली जातात त्यामुळे आजच मी सर्व दूध उत्पादकांना सांगू इच्छिते, मी उद्याच्या बैठकीत निश्चितपणे आपली बाजू मांडेन आणि जर दूध उत्पादकांच्या हिताचा निर्णय नाही झाला तर संचालकपदाचा कसलाही विचार न करता दरवाढीसाठी आपल्यासोबत रस्त्यावर उतरेन. माझी भूमिका मी जाहीरपणे मांडली.आता सत्ताधाऱ्यांनी सारासार विचार करून निर्णय घ्यावा ही त्यांना शेवटची विनंती, अशी प्रतिक्रिया त्यांनी समाज माध्यमावर दिली आहे.

महाडिकांनी सत्ताधाऱ्यांना नेहमीच नजरकैदेत ठेवले...

गोकुळ दूध संघात संचालिका शौमिका महाडिक यांनी सत्ताधाऱ्यांना नेहमीच नजरकैदेत ठेवले आहे. गाय दूध खरेदी दरात घट केल्याने जिल्ह्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. हा लढा आणखी तीव्र होण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःहून लढा पुकारला आहे. (Kolhapur Politics)

Satej Patil, Hasan Mushrif, Shoumika Mahadik
Sugarcane FRP News : शेतकरी संघटना आक्रमक; ऐन दिवाळीत शेतकऱ्यांचे शिमगा आंदोलन...रघुनाथ पाटील

त्यावर राजकीय टीका टिपणी झाल्यास मूळ विषय बाजूला फेकला जातो. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून गोकुळच्या या निर्णयावर संचालिका महाडिक या अलिप्त होत्या. गोकुळच्या या निर्णयाविरोधात लोक चळवळ उभी राहण्यासाठी त्यांची ही भूमिका महत्त्वाची ठरली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Satej Patil, Hasan Mushrif, Shoumika Mahadik
Manoj Jarange Patil News : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात जरांगे पाटलांची तोफ धडाडणार; दहिवडीत जाहीर सभा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com