Amravati News : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या विरोधात धनगर समाज संतप्त

Radhakrishna Vikhe Patil : अमरावतीत शनिवार धनगर समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत निदर्शने केली.
Amravati News
Amravati NewsSarkarnama
Published on
Updated on

Amravati Andolan : राज्यातील मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच तापला आहे. जालना जिल्ह्यात उपोषण करणाऱ्या मराठा कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आंदोलनांना सुरुवात झाली. या आंदोलनाची धग कायम असतानाच आता राज्यातील धनगर समाजही संतप्त झाला आहे. अमरावतीत शनिवार (ता. ९ सप्टेंबर) रोजी धनगर समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत निदर्शने केली. या वेळी टायर जाळत राज्य शासनाचा निषेधही करण्यात आला. आंदोलनकर्त्यांचा मुख्य रोष होता तो राज्य सरकारचे मंत्री व भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर

राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) सोलापूर दौऱ्यावर असताना धनगर आरक्षण कृती समितीच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली होती. धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी या समितीने विखे पाटील यांना निवेदन दिले. त्या वेळी समितीमधील एका कार्यकर्त्याने विखे पाटील यांच्यावर भंडारा उधळला होता. या प्रकारामुळे गोंधळ उडाला. मंत्री विखे पाटील यांनी यानंतर संयम दाखविला असला तरी तेथे उपस्थित असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी व विखे पाटील यांच्या समर्थकांनी भंडारा उधळणाऱ्यांना शेखर बंगाळे यांना मारहाण केली.

Amravati News
Shivsena VS BJP : ठरलं..! शिवसेना वऱ्हाडातील ‘या’ जिल्ह्यात करणार भाजपची कोंडी!

धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्याला झालेल्या या मारहाणीचे पडसाद अमरावती जिल्ह्यात उमटले आहेत. जिल्ह्यातील धनगर समाजाने एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. आंदोलकांनी राधाकृष्ण विखे पाटील व राज्य सरकारच्या विरोधात चांगलीच घोषणाबाजी केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलनकर्त्यांनी टायर पेटवून दिले. वातावरण अधिक बिघडू नये म्हणून अमरावती शहर पोलिसांनी (Police) वेळीच मध्यस्थी करीत आंदोलकांची समजूत काढली.

Amravati News
Baramati politics : अजितदादांनी बारामतीत भाकरी फिरवली; ‘माळेगाव’च्या अध्यक्ष-उपाध्यक्षांचे राजीनामे मंजूर

संतोष महात्मे म्हणाले, धनगर समाजात भंडाऱ्याला महत्वाचे स्थान आहे. भंडारा पवित्र मानण्यात येतो. मात्र, मारहाण करणाऱ्यांनी विखे पाटील यांच्यावर कार्यकर्त्यांनी जणू काही एखादी आक्षेपार्ह वस्तु उधळली असे भासविले. त्यानंतर त्यांना मारहाणही करण्यात आली. हा प्रकार पूर्णपणे निंदनीय आहे. धनगर समाज त्यांच्या हक्काचे आरक्षण मागत आहे. सरकारचे प्रतिनिधी म्हणून विखे पाटील यांच्याकडे दाद मागण्यात आली. मात्र, धनगरांचे प्रश्न सरकारला ऐकायचेच नसतील तर तसे सरकारने स्पष्ट करावे. त्यानंतर धनगर समाज आपला निर्णय घेण्यासाठी मोकळा होईल.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com