Baramati politics : अजितदादांनी बारामतीत भाकरी फिरवली; ‘माळेगाव’च्या अध्यक्ष-उपाध्यक्षांचे राजीनामे मंजूर

Malegaon sugar Factory : बाळासाहेब तावरे यांचे साखर कारखान्यातील योगदान पाहता त्यांना कायम ठेवण्यासाठी अनेकांनी शर्थीचे प्रयत्न केले.
Ajit Pawar&NCP Leader
Ajit Pawar&NCP LeaderSarkarnama

Malegaon News : बारामतीच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे आणि उपाध्यक्ष सागर जाधव यांचे राजीनामे आजच्या (ता. ९ सप्टेंबर) संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आले. विशेषतः बाळासाहेब तावरे यांचे साखर कारखान्यातील योगदान पाहता त्यांना कायम ठेवण्यासाठी अनेकांनी शर्थीचे प्रयत्न केले. खुद्द अजित पवारांना साकडे घातले, पण त्यांचाही राजीनामा आज घेण्यात आला. त्यामुळे अजित पवारांनी बारामतीत भाकरी फिरवलीच, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून, माळेगावचे नवे शिलेदार कोण, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. (Resignation of Chairman, Vice Chairman of Malegaon Sugar Factory approved)

माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे आणि उपाध्यक्ष सागर जाधव यांनी बुधवारी (ता. ६ सप्टेंबर) आपल्या पदाचे राजीनामे दिल्याने बारामतीत एकच खळबळ उडाली होती. या दोघांनी राजीनामे का दिले, अशी चर्चा होती. त्याचे पडसादही तालुक्यात ठिकठिकाणी उमटले होते. खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा माळेगावमध्ये अडविण्यात आला होता. त्यामुळे तावरे-जाधव यांचे राजीनामे मंजूर होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले हेाते. मात्र, आजच्या सभेत दोघांनाही पदमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

Ajit Pawar&NCP Leader
Ramesh Kadam Mohol Tour : माजी आमदार रमेश कदम २४ सप्टेंबरला मोहोळ दौऱ्यावर; कोणाचे गणित बिघडणार…कोणाला फायदा होणार?

दरम्यान, माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीत स्वीकृत संचालक म्हणून नितीन पोपटराव जगताप, तर कामगार संचालक म्हणून सुरेश गुलाबराव देवकाते यांना संधी दिली आहे. आता कारखान्याच्या अध्यक्षपदी आणि उपाध्यक्षपदी उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोणाला संधी देतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Ajit Pawar&NCP Leader
Congress Jansamvad Yatra : भाजपकडून देशात ब्रिटिशनीतीचा अवलंब; काँग्रेस जिल्हाध्यक्ष मोहिते पाटलांचा आरोप

बाळासाहेब तावरे यांच्या कारकिर्दीमध्ये माळेगाव साखर कारखान्याने राज्यात ३४११ रुपयांचा दर दिलेला आहे, त्यामुळे तावरे यांचा राजीनामा नामंजूर करण्यात यावा, अशी मागणी अनेकांकडून करण्यात येत होती. माळेगावमध्ये अजित पवार यांनी काल सांगितले होते की, बाळासाहेब तावरे यांचा राजीनामा मी घेतलेला नाही. आपला राजीनामा त्यांनी स्वतःहून दिला आहे. त्यामुळे राजीनामा मागे घ्यायची की नाही, हे बाळासाहेबांनीच ठरवायचे आहे. माझी कोणतीही हरकत नाही, असे स्पष्ट केले होते. मात्र, आज त्यांचा राजीनामा मंजूर झाल्याने दादांनी भाकरी फिरवल्याचे स्पष्ट झाले आहे.

Ajit Pawar&NCP Leader
Pankaja Munde Shiv Shakti Parikrama : पंकजा मुंडेंच्या मनात चाललंय तरी काय?; ‘राज्याच्या राजकारणात सक्रिय नाही, पण ‘वेट ॲण्ड वॉच...’

दुसरीकडे स्वीकृत संचालक पोपटराव बुरुंगले यांचा एक वर्षाचा कार्यकाळ संपला होता. त्यामुळे त्यांच्या जागेवर नितीन पोपटराव जगताप (पणदरे) यांची निवड करण्यात आली आहे. कामगार संचालक म्हणून सुरेश गुलाबराव देवकाते यांना संधी दिली आहे. देवकाते यांनी बारामती सहकारी बॅंकेचे संचालक म्हणून या अगोदर काम केलेले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com