Shivsena VS BJP : ठरलं..! शिवसेना वऱ्हाडातील ‘या’ जिल्ह्यात करणार भाजपची कोंडी!

Uddhav Thackeray : उद्धव सेनेने अकोल्यात स्वाक्षरी मोहीम हाती घेतली आहे.
Shivsena and BJP
Shivsena and BJPSarkarnama

Akola District Political News : राज्यात सत्तांतर झाल्यापासून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) अनेक ठिकाणी काट्याची टक्कर सुरू आहे. एकमेकांना लक्ष्य करण्याची कोणतीही संधी दोन्ही पक्ष चुकविताना दिसत नाहीत. अशात वऱ्हाडात भाजपचा गड ढासळण्याचे पूर्ण प्रयत्न उद्धव ठाकरे गट करीत आहे. (Uddhav Sena has taken up signature campaign in Akola)

अकोल्यात ठाकरे गटाने भाजप आणि शिंदे गटाविरुद्ध रणशिंग फुंकले आहे. महापालिकेने केलेल्या करवाढीच्या विरोधात उद्धव सेनेने अकोल्यात स्वाक्षरी मोहीम हाती घेतली आहे. चौकाचौकांत फलक उभारून त्यावर नागरिकांची ‘संतापाची सही’ घेण्यात येत आहे. भाजपनेही उद्धव सेनेच्या या कृतीला जशात तसे उत्तर देण्यास सुरुवात केली आहे.

उद्धव (UIddhav Thackeray) सेनेने शहरातील चौकाचौकांत उभारलेल्या फलकांवर भाजप व शिंदे सेनेचे समर्थन जाऊन नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे, (Eknath Shinde) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या समर्थनार्थ संदेश लिहून परत येत आहे. याशिवाय या फलकांवर उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्यावर टीका करणारे संदेशही लिहिले जात आहेत.

उद्धव सेना केवळ फलकावरील स्वाक्षरी मोहिमेवरच थांबलेली नाही. आता त्यांनी केंद्र व राज्य सरकारची पोलखोल करण्यासाठी ‘चला होऊ द्या चर्चा’ ही मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. आजपासून (ता. नऊ) ही मोहीम सुरू झाली आहे. अकोला जिल्ह्यातील जवळपास ९०० गावांमध्ये बैठका घेऊन भाजपला घेरण्याची तयारी उद्धव सेनेने अकोल्यात केली आहे.

Shivsena and BJP
Akola Political News: प्रकाश आंबेडकरांच्या बालेकिल्ल्यात संभाजीराजेंच्या 'स्वराज्य'ची मोर्चेबांधणी !

९०० गावांमध्ये सभा, बैठक घ्यायची असल्याने उद्धव सेनेने मोठी टीमही नेमली आहे. प्रत्येक तालुक्यासाठी १० टीम तयार करण्यात आल्या आहेत. आजपासून सुरू झालेल्या उद्धव सेनेच्या या मोहिमेमुळे अकोला जिल्ह्यात पुन्हा एकदा भाजप व ठाकरे गट यांच्यात राजकीय कुरघोडी रंगणार आहे.

भाजपने जनतेला खोटी आश्वासने दिली असून, अकोलेकरांना जगण्यासाठीही संघर्ष करावा लागत आहे. शेतकऱ्यांसह सामान्य जनता कधी नव्हे तेवढी संकटात आहे. त्यामुळे ‘होऊ द्या चर्चा’ या मोहिमेच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या कारभाराची पुराव्यासह पोलखोल करण्यात येईल, असे जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांनी या मोहिमेच्या निमित्ताने स्पष्ट केले.

Shivsena and BJP
Akola Politics News: अकोला लोकसभेसाठी 'वंचित'सोबत युती किती फायद्याची ठरेल ? ठाकरेंनी घेतला कानोसा

महागाई, इंधन, गॅस सिलिंडरचे भडकलेले भाव, बेरोजगारी, घरकुल योजना आदींबाबत भाजपने दिलेली आश्वासने व प्रत्यक्ष स्थिती यावर ठाकरे गटाकडून घेण्यात येणाऱ्या बैठकांमध्ये चर्चा होणार आहे. अतिवृष्टीमुळे पीक, शेतजमिनीची हानी झाली आहे. या नुकसानीची न मिळालेली मदत, बियाणे, खतांची कृत्रिम टंचाई, पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था, रखडलेले सिंचन प्रकल्प, विकासकामांना दिलेली स्थगिती आदींवर ठाकरे गटाकडून टीकास्त्र डागण्यात येणार आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com