Amravati Graduate Constituency Election : कॉंग्रेसकडून अमरावती पदवीधर मतदार संघतून धीरज लिंगाडे यांना उमेदवारी जाहीर

धीरज लिंगाडे यांचे नाव अनपेक्षित असल्याचे बोलले जात होते.
Amaravati Padavidhar Election
Amaravati Padavidhar Election
Published on
Updated on

Amravati Graduate Constituency Election : अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी कॉंग्रेसकडून धीरज लिंगाडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लिंगाडे यांनी काल रात्रीच ठाकरे गटातून कॉंग्रेसमध्ये (Congress) प्रवेश केला. ते ठाकरे गटाचे बुलडाण्याचे माजी जिल्हाप्रमुख आहेत. विशेष म्हणजे महाविकास आघाडीनेही (Mahavikas Aghadi) लिंगाडे यांच्या उमेदवारीला मान्यता दिली आहे.

'मी काँग्रेसच्या एबी फॉर्मवर अर्ज दाखल करणार असलो तरी महाविकास आघाडीचाच उमेदवार आहे. आमच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांसोबत समन्वय आहे, असे धिरज लिंगाडे यांनी म्हटले आहे. ''सुरुवातीला अमरावती पदवीधर मतदार संघासाठी कोणाचे नाव जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. धीरज लिंगाडे यांचे नाव अनपेक्षित असल्याचे बोलले जात होते. कारण अमरावती पदवीधर मतदार संघासाठी सुनील देशमुख यांचे नावाची चर्चा होती. त्यानंतर मिलिंद चिमोटे यांच्याही नावाची चर्चा होती.

Amaravati Padavidhar Election
Enforcement Directorate : तुम्हालाही ईडीची भीती वाटते का? मग हे वाचाच

अकोल्याचे डॉ, सुनील ढोणे यांना तर तीन महिने आधीच कामाला लागण्याचे आदेश पक्षाकडून देण्यात आले होते. पण ही सर्व नावे अचानक मागे पडली आणि कॉंग्रेसने अनपेक्षितपणे धीरज लिंगाडे यांची उमेदवारी जाहीर केली.

दरम्यान, शिवसेनेने अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघासाठी दीड वर्षाआधीपासूनच तयारी सुरू केली हाेती. शिवेसनेचे ज्येष्ठ नेते अनिल देसाई यांनी मतदार नोंदणी, बैठकांसह इतर गोष्टींच्या सर्व जबाबदाऱ्या धिरज लिंगाडे यांच्याकडेच दिल्या होत्या. यातून लिंगाडे हेच शिवसेनेचे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार असतील, असे संकेत दिले होते. राज्यातील सत्तांतरानंतरही लिंगाडे यांनी ठाकरे गटाची साथ सोडली नाही. पण अमरावतीची जागा काँग्रेसकडे असल्याने अखेर शिवसेनेने आपला उमेदवार काँग्रेसच्या कोट्यात दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com