धान उत्पादक शेतकऱ्यांना थेट पैसे मिळणार : अजित पवार

राज्यातील धान येऊन आपल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना (Paddy grower Farmers) नुकसान होऊ नये यासंदर्भात जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांची बैठक घेतली होती.
DyCM Ajit Pawar

DyCM Ajit Pawar

Sarkarnama

Published on
Updated on

मुंबई : धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याऐवजी जो धान उत्पादक शेतकरी आहे त्याच्या डायरेक्ट खात्यात डीबीटीच्या (DBT)माध्यमातून पैसे देण्याचे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सभागृहात सरकारच्या वतीने आज (ता.28 डिसेंबर) दिले. विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याबाबतचा मुद्दा अनेक आमदारांनी उपस्थित केला होता. यावर बोलताना पवार यांनी ही घोषणा केली आहे.

DyCM Ajit Pawar

एक आमदार थेट मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसले अन् अजितदादांनी घेतलं दमात...

पवार म्हणाले, मुळ धान उत्पादक शेतकऱ्यांना पैसे जाण्याऐवजी बर्‍याचदा व्यापारी वर्गाकडे पैसे जातात. आजुबाजुला असणाऱ्या राज्यातही धानाला बोनस दिला जातो. मात्र, त्या राज्यातील धानही आपल्या राज्यात येते आणि ते सुद्धा बोनसचा फायदा घेतात याकडेही पवारांनी लक्ष वेधले. तसेच, बाहेरच्या राज्यातील धान येऊन आपल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान होऊ नये त्यांचा फायदा व्हावा यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांची बैठक घेतली होती, असेही त्यांनी सांगितले.

DyCM Ajit Pawar

नितेश राणे कुठे आहेत हे माहिती असले तरी मी सांगणार नाही

या सगळ्याचा विचार करून महाविकास आघाडी सरकारने (Mahavikkas Aghadi Government) डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना (Farmers) डायरेक्ट खात्यात पैसे मिळण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जे खरे धान उत्पादक आहेत त्यांना पैसे मिळतील. त्यांच्या नावाखाली नको ती दुकानदारी चाललेली आहे. ती फार मोठी आहे. याचा विचार मंत्रीमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली झाला असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सभागृहात स्पष्ट केले.

हेही वाचा: कोंबडी चोर, बेडुक आता मांजर झाले आहेत ; दानवेंचा राणेंवर प्रहार

राज्यातील महाविकास आघाडी सरकार व त्यांचे मंत्री चांगले काम करत असतांना केवळ त्यांना आणि महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी विरोधक त्यांच्यावर टीका करत आहेत. काल-परवा सभागृहाबाहेर एका सदस्याने राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे विधानभवनात येतांना मांजराचा आवाज काढत म्याॅव म्याॅव केले. हे आधी कोंबडीचोर होते, नंतर बेडूक उड्या मारू लागले आणि आता त्यांची मांजर झाली आहे, अशा शब्दात शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी नितेश राणे यांच्यावर प्रहार केला.

विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्ताववर बोलतांना त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला देखील चढवला. आदित्य ठाकरे हे वाघ आहेत, त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अशा माकड चाळ्यांना कधीच भीक घालणार नाही, असेही दानवे म्हणाले. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नते प्रवीण दरेकर यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या विषयावरील अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलतांना महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती.

त्याला प्रत्युत्तर देतांना अंबादास दानवे यांनी मागच्या सरकारच्या काळातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेला बदल हे आकडेवारीसह सभागृहात मांडले. अंबादास दानवे म्हणाले, राज्याला बदनाम करण्यासाठी विरोधक काम करत आहेत. पण महाविकास आघाडीच्या कोरोना काळातील चांगल्या कामाची दखल थेट जागतिक पातळीवर घेतली गेल्याने विरोधक तोंडावर आपटले आहेत.

DyCM Ajit Pawar

सिंधुदुर्गात संतोष परब यांच्यावर हल्ला कसा झाला आणि नक्की काय घडले?,पाहा व्हिडिओ

पण ईडी, सीबीआय सारख्या संस्थांना हाताशी धरून महाविकास आघाडीतील नेते, मंत्र्यांना त्रास देण्याचे प्रकार विरोधकांकडून सुरूच आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाचे कौतुक देखील देश व जागतिक पातळीवर झाले. पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणासाठी केलेल्या कामाची देखील आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली. त्यांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले, परंतु काहीजणांना यामुळेच पोटसुळ उठला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com