एक आमदार थेट मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसले अन् अजितदादांनी घेतलं दमात...

किमान मुख्यमंत्र्यांच्या तरी खुर्ची बसू नये, हे कळू नये का? अशी विचारणा पवारांनी केली.
Ajit Pawar 

Ajit Pawar 

Sarkarnama

Published on
Updated on

मुंबई : विधिमंडळ अधिवेशन (Assembly Winter Session) आणि मंत्रालयात बेजबाबदारणे वागणाऱ्या मंत्री, आमदारांना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मंगळवारी आपल्या दमदार 'स्टाईल'ने फैलावर घेतले. सभागृहात आल्यानंतर अनेक आमदार बेशिस्तपणे वागत असल्याचे सांगत पवारांनी पदाचा मान राखण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी सभागृहात मुख्यमंत्र्यांच्या आसनाबाबत घडलेला किस्साही सांगितला.

विधानसभेत (Assembly) बोलताना अजित पवार म्हणाले, कोणी कोठेही बसतात? परवा तर एक आमदार मुख्यमंत्र्यांच्याच खुर्चीत बसले, हे वागणे बरे नाही. किमान मुख्यमंत्र्यांच्या तरी खुर्ची बसू नये, हे कळू नये का ? अशी विचारणा करीत पवारांनी बेशिस्तपणे वावरणाऱ्यांना दमात घेतले. ज्याकडे १४५ आमदारांचे बळ असेन; त्याने खुशाल मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसावे, असा मिश्किल चिमटाही त्यांनी काढला.

<div class="paragraphs"><p>Ajit Pawar&nbsp;</p></div>
कोंबडी, मांजरी, कुत्र्यांचे प्रतिनिधित्व करतो का? अजितदादांनी आमदारांना फटकारलं

पद-खुर्चीचा मान-सन्मान न ठेवणाऱ्या आमदारांना पवार संताल्याने सभागृहातही शांतता राहिली. विधिमंडळ अधिवेशन आणि आवारात आमदारांसाठी तयार केलेल्या शिस्तीच्या नियमांवर पवार बोलायला उभे राहिले आणि क्षणात आमदारांच्या वागण्यांवरून संतापले. काही आमदार माझ्याकडे येतात. ते किती वेळा येतात. एकजण दहावेळा येतो. एकदाच कामे करून घेता येत नाहीत का? दहावेळा का येता ? आमदारांनी कुठे आणि कसे बसावे हे कोणाला सांगण्याची गरज नसते. मात्र, अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. अशा काय बोलावे ? असे सांगून पवारांनी आपली नाराजी मांडली.

राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना पाहून 'म्याव... म्याव...करीत डिवचणारे भाजपचे आमदार नितेश राणेंना (Nitesh Rane) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फटकारले. 'आपण, प्राणी, मांजरी, कुत्र्यांचे प्रतिनिधित्व करीत नाही रे बाबा... तसे करू नका... अशी नक्कल केल्याने प्राण्यांना काय वाटेल' अशा शब्दांतच पवार यांनी बेशिस्त आमदारांना सुनावले. एकमेकांकडे पाहून आवाज काढून आणि हावभाव करून कोणाला हिणवणे आपल्याला शोभत ननसल्याकडे पवार यांनी आमदारांचे लक्ष वेधले. पवारांसोबत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही टिंगलटवाळी करणाऱ्या आमदारांचे कान उपटले.

<div class="paragraphs"><p>Ajit Pawar&nbsp;</p></div>
ध्वजस्तंभावरून पडणारा झेंडा सोनिया गांधींनी झेलला अन्...

अधिवेशनात राणेंनी आदित्य यांच्याकडे पाहात 'म्याव...म्याव... केल्याचे पडसाद विधिमंडळाच्या कामकाजात उमटत आहे. आधी वाघाची डरकाळी फोडणारी शिवसेना आता मांजरीसारखीच असल्याचे राणेंनी सांगितले होते. त्यावरून राणेंच्या वागण्यावर आक्षेप घेत, त्यांना विधानसभेतून निलंबित करण्याचा आग्रह ठाकरे सरकारच्या मंत्री, आमदारांनी धरला होता. त्यावरून सत्ताधारी-विरोधकांत सोमवारी वादही झाला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com