Bhandara : डीपीसी निमंत्रकांच्या ‘इनकमिंग-आउटगोइंग’ने महायुतीत होणार रुसवे-फुगवे

Ajit Pawar : उपमुख्यमंत्र्यांच्या पत्रानंतर जिल्हा नियोजन समितीची सदस्य संख्या झाली 15
Collector Office Bhandara.
Collector Office Bhandara.Google
Published on
Updated on

District Planning Committee News : राज्यात सत्ता ज्याची त्या पक्षांच्या कार्यकर्त्यांची जिल्हा नियोजन समितीवर (DPC) वर्णी हे समीकरण नेहमीचं आहे. महाराष्ट्रात सध्या शिवसेना एकनाथ शिंदे गट, भाजप सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सहभागी झाला आहे. त्यानंतर आता भंडारा जिल्हा नियोजन समितीत निमंत्रित सदस्य संख्येवर रुसवे-फुगवे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जिल्हा नियोजन समितीत सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा प्रभाव वाढलेला दिसत आहे. जिल्हा नियोजन समितीत जुलैमध्ये नऊ निमंत्रित सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. नियोजन विभागाची धुरा असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार सहा सदस्यांना निमंत्रित करण्याचे पत्र काढण्यात आलं. त्यामुळे पूर्वीचे नऊ आणि आताचे सहा अशी निमंत्रित सदस्य संख्या 15 झाली आहे. (Dispute May Rise After New Member Appointment In District Planning Committee Of Bhandara After Letter Of NCP Leader & DCM Ajit Pawar)

Collector Office Bhandara.
Bhandara : तेलंगणातील ‘केसीआर’च्या ‘बीआरएस’ची महाराष्ट्रात भ्रूणहत्या

नियमानुसार जिल्हा नियोजन समितीत अधिकृत निमंत्रित सदस्य संख्या नऊच असते. त्यामुळं आता या समितीत कायम कोण राहणार आणि कुणाला डच्चू मिळणार, याबद्दल चर्चा रंगत आहे. केवळ सदस्य संख्या वाढविण्याच्या नादात आपसात मतभेद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विकासाच्या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्यात शासनाकडून नियोजन समिती गठीत करण्यात येते. या समितीचे अध्यक्ष पालकमंत्री तर सचिव जिल्हाधिकारी असतात.

खासदार, आमदार, पदसिद्ध सदस्य असतात. नऊ निमंत्रित सदस्य असतात. जिल्हा नियोजनाचा अनुभव तज्ज्ञ व विशेष निमंत्रित म्हणून या सदस्यांची नियुक्ती केली जाते. सभागृहात या सर्व सभासदांना विविध विकासकामांवर खर्च झालेल्या निधीवर चर्चा करता येते, सूचना करता येतात. एखाद्या निर्णयावेळी मतदान मात्र करता येत नाही. त्यामुळे निमंत्रित सदस्य केवळ मतप्रदर्शित करण्यापुरते असतात.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उपमुख्यमंत्री (नियोजन) यांच्या निर्देशानुसार नवीन निमंत्रित सदस्यांमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य विजय सावरबांधे (ता. पवनी), जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे (ता. भंडारा), माजी जिल्हा परिषद सदस्य नंदकिशोर समरीत (ता. साकोली), उमराव आठोळे (ता. लाखनी), माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे (ता. तुमसर), रीता हलमारे (ता. मोहाडी) यांचा समावेश आहे. जुलैत तत्कालीन पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके, माजी खासदार शिशुपाल पटले, माजी आमदार बाळा काशीवार, माजी जिल्हा परिषद सदस्य वामन बेदरे, डॉ. नेपाल रंगारी, राजेश बांते, रेखा भाजीपाले, संजय कुंभलकर, अशोक पटले या नऊ निमंत्रित सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.

सहा महिन्यांनी पुन्हा सहा सदस्यांना निमंत्रित करण्याचे पत्र जारी करण्यात आले आहे. शिवसेनेतर्फे एकही सदस्य नाही. या समितीत निमंत्रित सदस्य संख्या नऊ असते, अशात 15 सदस्य संख्या झाल्यानं काही नावांना कात्री लावावी लागणार आहे. त्यामुळं समितीत कायम कोण राहील व कुणाला डच्चू मिळेल याबाबत उत्सुकता आहे. सदस्यांच्या या ‘इनकमिंग-आउटगोइंग’च्या नादात नाराजीनाट्याला सुरुवात होण्याचे संकेत आहेत.

Edited by : Prasannaa Jakate

Collector Office Bhandara.
Bhandara News : शासन दारी आले; हर घर नल, हर घर जल योजना देऊन गेले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com