Mahayuti : शिवसेना-भाजपचा मोठा निर्णय; मुंबईतील 'या' मतदारसंघांची होणार अदलाबदली?

Assembly Election 2024 : अंधेरी पूर्व या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे मुरजी पटेल आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या स्वीकृती प्रदीप शर्मा या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत, त्यामुळे या मतदारसंघावरून महायुतीमध्ये कुरबुरी सुरू होत्या.
Eknath Shinde-Devendra Fadnavis
Eknath Shinde-Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 23 September : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाबाबत वाटाघाटी सुरू आहेत. युती आणि आघाडीतील एकापेक्षा अधिक पक्षांनी एकाच मतदारसंघावर दावा सांगितला आहे, त्यामुळे नेतेमंडळींची डोकेदुःखी वाढली आहे.

मात्र, महायुतीमधील शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात काही जागांच्या अदलाबदलीवर समझोता होत असल्याचे दिसून येत आहे. विशेष मुंबईत हे चित्र दिसून येत आहे. त्यातूनच मुंबईतील अंधेरी पूर्व आणि दिंडोशी मतदार संघांची भाजप आणि शिवसेनेत आदलाबदली होणार असल्याची माहिती आहे.

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक (Assembly Election) ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्या दृष्टीने राजकीय पक्षांकडून हालचाली सुरू आहेत. महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) प्रत्येक तीन पक्ष आहेत, त्यामुळे जागा वाटपाचा मोठा पेच दोन्हीकडे आहे.

जिंकलेल्या जागांवर तातडीने मार्ग निघत आहे. त्यातही काही ठिकाणी अडचणी आहेत. मात्र मागील निवडणुकीत दोन नंबर असलेल्या पक्षाकडून विद्यमान जागांवर दावा सांगितला जात आहे, त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांची अडचण होत आहे.

महायुतीमधील शिवसेना आणि भाजपची युती ही सर्वांत जुनी आहे, त्यामुळे या दोन पक्षांमध्ये एकमेकांबद्दल ॲडरस्टॅंडिंंग दिसून येत आहे. त्यातूनच काही मतदारसंघाची अदलाबदली होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विशेषतः मुंबई आणि परिसरात याबाबतची शक्यता अधिक आहे.

Eknath Shinde-Devendra Fadnavis
Mahavikas Aghadi : काँग्रेस अन्‌ ठाकरेंच्या शिवसेनेकडून पवारांच्या राष्ट्रवादीला चॅलेंज; चंदगडमध्ये आघाडीत बिघाडी?

मुंबईतील अंधेरी पूर्व आणि दिंडोशी या मतदार संघांची महायुतीमधील शिवसेना आणि भाजप या पक्षांमध्ये आदलाबदली होणार असल्याची माहिती आहे. जागा वाटपावरून उद्‌भवणारे महायुतीमधील संभाव्य वाद टाळण्यासाठी शिवसेना-भाजपमध्ये समझोता झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

अंधेरी पूर्व या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे मुरजी पटेल आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या स्वीकृती प्रदीप शर्मा या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत, त्यामुळे या मतदारसंघावरून महायुतीमध्ये कुरबुरी सुरू होत्या. त्या वादावर आता तोडगा निघाल्याची माहिती मिळाली आहे.

Eknath Shinde-Devendra Fadnavis
Umesh Patil Vs Rajan Patil : सुनील तटकरे, अजितदादांनी उमेश पाटलांना निर्वाणीचा इशारा आताच का दिला?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अंधेरी पूर्व हा मतदारसंघ भाजपसाठी सोडणार आहेत. त्या बदल्यात स्वीकृती प्रदीप शर्मा यांना दिंडोशी मतदार संघातून उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती आहे. या दोन्ही जागेवरून शिवसेना आणि भाजपमध्ये हा समझोता झाल्याचे सांगितले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com