Pradeep Kurulkar Honey Trap Case: पुण्यातील संरक्षण संशोधन संस्थेचे (DRDO) संचालक प्रदीप कुरूळकर हनी ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत. त्यानंतर कुरुळकरला निलंबित करण्यात आले. आता या प्रकरणात नागपूरचा मूळ रहिवासी असलेला निखिल शेंडे याचे नाव आलेले आहे. (Nikhil Shende is a native of Nagpur)
कुरुळकर हा देशाची संवेदनशील माहिती लीक करत असल्याचे सिद्ध झाल्यानंतर त्याला डीआरडीओच्या संचालक पदावरून हटवण्यात आले. गुप्तचर यंत्रणांकडून त्याच्याविरुद्ध माहिती मिळाल्यानंतर डीआरडीओने तपास सुरू केला. या तपासात तो पाकिस्तानातील गुप्तहेरांच्या संपर्कात असल्याचे आढळून आले .
पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेने हनी ट्रॅप मध्ये अडकवण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपात चौकशीच्या फेऱ्यात असलेला हवाई दलातील शिपाई निखिल मुरलीधर शेंडे हा नागपूरचा आहे. शांतीनगर परिसरात निखिल यांचे आई आणि काका राहतात. या संदर्भातली बातमी वाचून धक्का बसल्याचं निखिलच्या कुटुंबीयांचे म्हणणं आहे. स्पोर्ट्स कोट्यामधून हवाई दलात अधिकारी बनलेल्या निखिलचं मैदान आणि घर हेच विश्व असल्याची भावना निखिलच्या आईने व्यक्त केली.
डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरूळकर हनी ट्रॅप मध्ये अडकलेले आहेत. या प्रकरणात आता निखिल शेंडे यांचं नाव पुढे आल्याने खळबळ उडाली. निखिल शेंडे धावपटू आहे. निखिलच्या मोबाईलवरून कुरूळकर यांना मेसेज आला होता की, ‘माझा मोबाईल का ब्लॉक केला’, त्यानंतर निखिलची चौकशी झाली आहे. दरम्यान निखिल हा निर्दोष असल्याचं त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं आहे. त्यांना केवळ चौकशीसाठी बोलावलं होतं, आता त्यांना सोडण्यात आलं आहे. कुठल्याही अशा प्रकरणाशी निखिलचा संबंध नसल्याचा दावा त्याच्या आईने केला आहे.
त्याचा मोबाईल नंबर या तपासात कसा पुढे आला, याबद्दल त्याची चौकशी सुरू आहे. निखिलचा नंबर या प्रकरणात कसा आला, हे त्यालाही माहिती नाही. पुण्यामध्ये त्याला चौकशीसाठी नेले, तेथे चौकशी झाली. पण त्यामध्ये तपास अधिकाऱ्यांना काहीही आढळले नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी निखिलला तेव्हाच सोडून दिले, असे निखिलच्या आईने सांगितले. आमचा निखिलवर पूर्ण विश्वास आहे. त्याने असे कुठलेही काम केलेले नाही, याची आम्हाला खात्री आहे. तो निर्दोष आहे आणि सध्या बंगळूरला कर्तव्यावर आहे, असे त्याचे काका म्हणाले.
कुरुळकर २०२२ पासून पाकिस्तानी (Pakistan) गुप्तहेरांच्या संपर्कात असल्याचे आढळून आल्यानंतर महाराष्ट्र (Maharashtra) दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) (ATS) अधिकृत गोपनीय कायद्यांतर्गत त्याला पुण्यातून (PUNE) अटक केली. एका महत्त्वाच्या पदावर असतानाही कुरुळकरने आपल्या पदाचा गैरवापर केला आणि संवेदनशील माहिती लीक करून देशाच्या सुरक्षेशी तडजोड केली. मुंबईतील (Mumbai) एटीएसच्या काळाचौकी युनिटमध्ये अधिकृत गुप्तता कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.