Eknath Shinde : आमच्या सरकारचं नागपूरमध्ये पहिलंच अधिवेशन होतं. गेली दोन वर्षे अधिवेशन झालं नाही, आणि सरकार बदललं नसतं तर या वर्षीही अधिवेशन झालं नसतं. विदर्भात अधिवेशन होत असताना, विदर्भवासीयांची अपेक्षा असते की, आपल्या प्रश्नांना न्याय मिळायला पाहिजे. अनुषेश भरून निघायला पाहिजे. या दृष्टीने अधिवेनाचं कामकाज दहा दिवस चाललं. विदर्भातले अनेक प्रश्न प्रलंबित होते, यावर निर्णय घेतले, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. मधल्या दललांना आता संधी मिळणार नाही. वैधानिक विकास महामंडळांचे पुनर्गठन होईल. समतोल प्रादेशिक विकासासाठी प्रयत्न होईल. विदर्भ पर्यटन सर्किट करणार आहोत. गोसीखुर्दमध्ये १०० एकर जागेवर जागतिक दर्जाचं मोठा मिजलपर्यटन प्रकल्प करत आहोत. सिंचनाच्या प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामुळे अडिच लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे, असेही शिंदे म्हणाले
सूरजागडचा लोहखनिज प्रकल्प आहे, तो मार्गी लागलाय. स्टिल उद्योगदेखील या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न आहे. यातूनही मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळेल. राज्याचं नवीन खनिज धोरण आखण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वैनगंगा, निलगंगा नदीजोड प्रकल्प महत्त्वपूर्ण आहे. याबाबत निर्णय घेतला आहे. गोसीखुर्दचं काम २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पेंच प्रकल्प २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, असे शिंदे म्हणाले.
विरोधीपक्षांनी सुरूवातीला तीन चार दिवस त्यांचं पायरऱ्यांवर आंदोलन सुरू होतं. जो विषयच नाही, तो विषय उचलून काढायचं. सरकारला बदनाम करण्याच प्रयत्न करायचा. कायदा सुव्यवस्था बिघडली आहे, भ्रष्टाचार झाला आहे, असे आरोप करायचे. महापुरूषांचा अपमान, सगळ्या चर्चा त्यांनी केल्या. सभागृहापेक्षा बाहेर जास्त चर्चा केल्या, असा टोलाही त्यांली विरोधकांना लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.