Fadanvis : लोकशाहीची हत्या होतेय, अशी ओरड करणारे फक्त ४६ मिनिटं अधिवेशनात होते...

Winter Session : हिवाळी अधिवेशन विदर्भाला नेहमीच काही ना काही देऊन जाते, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले
Devendra Fadanvis and Uddhav Thackeray.
Devendra Fadanvis and Uddhav Thackeray.Sarkarnama

Maharashtra Assembly Winter Session : विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन आज पार पडलं. दोन्ही सभागृहात कामकाज चांगलं झालं. मध्येमध्ये कामकाज बंद जरी पडलं, तरी दिवसरात्र कामकाज करून आपण वेळेची तूट भरून काढली. शेवटी शेवटी विरोधी पक्षानेही चांगले सहकार्य केल्याने अनेक महत्वाच्या चर्चा झाल्या. हिवाळी अधिवेशन (Winter Session) विदर्भाला नेहमीच काही ना काही देऊन जाते, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले.

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसाचे कामकाज संपल्यानंतर पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, हे अधिवेशन होईल की नाही हा प्रश्न होता. मात्र अधिवेशन झालं आणि मुख्यमंत्र्यांनी (Eknath Shinde) अनेक महतवाचे निर्णयसुद्धा घेतले. या अधिवेशनात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सिंचनाचे अनेक प्रकल्प घोषित केले गेले. नागपूर गोवा मार्ग, नानाजी देशमुख प्रकल्पाची घोषणा या अधिवेशनात महत्वाची ठरली. हे प्रकल्प हजारो कोटीचे आहेत.

विदर्भवासियांना या अधिवेशनातून मोठा दिलासा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. यासाठीच नागपूर अधिवेशनात विदर्भ हा अजेंडा असतो. हे नागपुरातील पहिल हिवाळी अधिवेशन आहे, जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलं. या अधिवेशनात विरोधकांनाही सर्व प्रश्नांची उत्तर देऊन मुख्यमंत्र्यांनी उघडं पाडलं. राज्यात लोकशाहीची हत्या होत आहे, अशी ओरड जे करीत होते, ते अख्या अधिवेशनात फक्त ४६ मिनीटं होते. यावरून त्याचं लोकशाहीवरचं प्रेम किती आहे, असे म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना जोरदार टोला हाणला.

आमचे सरकार देना बँक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आम्हाला देणे माहीत आहे. त्यामुळेच विदर्भ आणि मराठवाडा या मागस भागाच्या विकासासाठी सहा महिन्यात भरभरून दिले. आमचे सरकार देना बँक असून आधीच्या सरकारप्रमाणे घेणे आम्हाला माहीत नाही, असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी आणलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना शिंदे यांनी विरोधकांपेक्षा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेलाच रोखठोक उत्तर दिले. तासभराच्या उत्तरात त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता शिवसेनेला चांगलेच सुनावले. ज्यांनी बाळासाहेबांना जेलमध्ये टाकले त्यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसला. बाळासाहेबांचे विचारही ज्यांनी गहाण ठेवले तेच आम्हाला आता गद्धार म्हणतात.

Devendra Fadanvis and Uddhav Thackeray.
Hiraben यांच्यामुळे नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्व जगावेगळे निर्माण झाले : फडणवीस

गद्दार कोण आणि प्रामाणिक कोण हे जनतेला कळून चुकले आहे. म्हणूनच ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप एक तर आम्ही नंबर दोनवर आलो. या पुढील निवडणुकांमध्ये झेंडा आमचा आणि अजेंडाही आमचाच राहील असा दावाही शिंदे यांनी केला. आता आम्हाला जास्त डिवचू नका असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी ज्यांना तुमची सर्व अंडीपिल्ली माहित आहे त्यांच्यावरच आरोप करता का, असा सवाल केला. मै खामोश हू पर जानता हू… बात निकलेगी तो बहोत दूर तक जायेगी.... असा अशी शायरी करीत त्यांनी शिवसेनेला इशारा दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com