Narendra Modi On Bhavana Gawali: मोदींची 'बहिणी'ला हाक....; भावना गवळींच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब?

Mahayuti Politics : पंतप्रधान मोदींच्या रक्षाबंधनाने खासदार भावना गवळी यांची ईडी पीडा टळल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केला होता. पण, ठाकरे यांनी बंधने पाळली नाहीत म्हणून शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्याचा दावा गवळी यांचा होता.
Bhavana Gawali & Narendra Modi.
Bhavana Gawali & Narendra Modi.Sarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 : वाशिम लोकसभा मतदारसंघाचे दोनदा (1999,2004) प्रतिनिधित्व आणि यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघाचे तीनवेळा (2009,2014 आणि 2019) प्रतिनिधित्व करणाऱ्या शिवसेना खासदार भावना गवळी यांना आज मोदींचा पुन्हा एकदा आशीर्वाद मिळाल्याचे चित्र यवतमाळच्या सभेत होते. इतकेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'आप पीछे क्यू सामने आईये' असे म्हणत सभेच्या शेवटी भावना गवळी यांना समोर बोलावले.

यवतमाळ दौऱ्यात मोदींनी खासदार भावना गवळी यांच्यासोबत तीनदा संवाद साधला. यवतमाळ येथील सभेतील बैठक व्यवस्थेत महिला नीट बसल्या आहेत की नाही याची खात्रीच मोदींनी भावना गवळी यांच्याकडून करुन घेतली. तर गवळी यांच्या रेल्वे विस्तारीकरणासाठीची मागणी मान्य करत त्याचे उद्घाटन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधणारी बहीण अशी ओळख असलेल्या भावना गवळी यांना मोदींनी दिलेली हाक त्यांच्या राजकीय करियरमध्ये साथ देणारी ठरणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेना नेत्या खासदार भावना गवळी यांना लाखो महिलांसमोर मागच्या बाजूने पुढे बोलविणे हा मोदींचा उमेदवार ओवाळणीचा खासदार गवळींना आशीर्वाद समजला जात आहे.

Bhavana Gawali & Narendra Modi.
PM Narendra Modi : मोदींच्या सभेतील खुर्च्यांवर राहुल गांधींचे फोटो; नेमकी सभा कुणाची ? उपस्थितांना प्रश्न

विविध तपास यंत्रणानी गेल्या काळात शिवसेना खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांच्यावर लक्ष केंद्रित केले होते. त्यानंतर शिंदे गटाच्या फुटीनंतर भावना गवळी यांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य करत भाजपला साथ दिली. त्यानंतर हिंगोलीच्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधली आणि ईडी थांबली अशी टीका खासदार गवळी यांच्यावर केली होती. गवळी यांनी देखील ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत बंधने पाळली नाहीत म्हणून ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करावा लागला होता असा टोला लगावला होता.

आता मात्र यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघात भावना गवळी यांच्या विरोधात उमेदवार देण्यास उध्दव ठाकरे इच्छूक असून त्याचा पराभव करण्याची तयारी उध्दव ठाकरे यांच्या शिवनेनेने केली आहे. असे असताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे नेते मंत्री संजय राठोड हे देखील इच्छूक आहेत. दूसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे इंद्रनील नाईक हे पत्नी अॅड.मोहिनी नाईक यांच्या तिकिटासाठी इच्छूक आहे. अशा परिस्थितीत मध्यंतरीत भावना गवळी यांनी 'मेरी झाँसी नही दूंगी' अशी घोषणा करत योग्य तो संदेश दिला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) खासदार भावना गवळी यांना 'आप पीछे क्यू सामने आईये' असा दिलेला संदेश राजकारणात महत्वाचा मानला जात आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार त्याच बरोबर मंत्री संजय राठोड हे स्टेजवर उपस्थित होते.

सहाव्यांदा लोकसभेत जाण्याच्या तयारी असलेल्या खासदार भावना गवळी यांच्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. खासदार भावना गवळी यांच्यासाठी आजची यवतमाळ येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहिर सभा पुन्हा उमेदवारी देणारी ठरु शकते, असेच संकेत पंतप्रधानांच्या एकुण वागणुकीवरुन दिसून येत आहे. याचा अंतिम निर्णय महायुतीच्या नेत्यांद्वारे होणार असून यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भुमिका महत्वाची ठरणार आहे.

Bhavana Gawali & Narendra Modi.
Loksabha Election 2024 : शिंदे-फडणवीस-अजित पवारांसाठी 'या' सर्व्हेने दिली 'GOOD NEWS'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com