Chandrapur : सरपंच, सचिवासह ग्रामपंचायत सदस्यांना डांबून ठेवले

Gram Panchayat : चंद्रपूर जिल्ह्यातील देवपायलीची घटना; करात वाढीमुळं संतापले ग्रामस्थ
Gram Panchayat DevPayli in Chandrapur.
Gram Panchayat DevPayli in Chandrapur.Sarkarnama

Rural Politics : मालमत्ता कर आणि पाणीपट्टीत वाढ करण्यात आल्यामुळं संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी सरपंच, सचिव आणि ग्रामपंचायत सदस्यांना तब्बल साडेतीन तास डांबून ठेवले. चंद्रपूर जिल्ह्यातील देवपायली येथे हा प्रकार घडला.

नागभीड तालुक्यातील देवपायली ग्रामपंचायतीत बुधवारी (ता. 29) ग्रामसभा बोलाविण्यात आली होती. ग्रामसभेत मालमत्ता व पाणीपट्टी कर वाढविण्यात आला. त्यामुळे ग्रामस्थ प्रचंड संतापले. (Entire Gram Panchayat Members Detained By villagers At Devpayli of Chandrapur District)

Gram Panchayat DevPayli in Chandrapur.
Chandrapur Shiv Sena : ‘मातोश्री’वरील आदेशांनंतरही चंद्रपुरात गटबाजी कायम

करवाढ करण्यात येत असल्याची माहिती मिळताच संतप्त ग्रामस्थांनी सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यालयात डांबले. तब्बल साडेतीन तास ही मंडळी कुलूपबंद होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी देवपायली गाठले. ग्रामस्थांची समजूत काढण्यात आली. त्यानंतर ग्रामस्थांनी कुलूप काढले व सदस्यांची मुक्तता केली.

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या देवपायली ग्रामपंचायतमध्ये यापूर्वी 7 नोव्हेंबरला ग्रामसभा बोलाविण्यात आली होती, परंतु सभा तहकूब करण्यात आली. तहकूब झालेली ही ग्रामसभा बुधवारी घेण्याचं ठरलं. सभेला सरपंच अरविंद कोहपरे, ग्रामसेवक प्रशांत दोडके, सदस्य अर्चना ठाकरे, इंदिरा नवघडे, मोरेश्वर नवघडे, वैशाली भोयर यांची उपस्थिती होती. सरपंचांनी सभेला सुरुवात केली. काही वेळातच ग्रामसभा संपली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ग्रामसभेत मालमत्ता कर व पाणीपट्टीवाढीचा ठराव मंजूर करण्यात आला. ही माहिती गावात पसरताच ग्रामस्थांचा पारा चढला. अनेक ग्रामस्थ सभेला येणार होते, परंतु ते येण्यापूर्वीच सभा आटोपण्यात आली. त्यामुळं संतापलेल्या ग्रामस्थांनी सदस्यांना कार्यालयात कोंडले व कुलूप लावले. पोलिसांच्या मध्यस्थीनं सर्वांची सुटका झाली. आता 4 डिसेंबला पुन्हा देवपायलीत ग्रामसभा घेण्यात येणार आहे. देवपायलीत घडलेल्या या प्रकारानं जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सरपंचांच्या परवानगीनं पाणीपट्टी व मालमत्ता करवाढीचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय नियमानुसार आहे, असं ग्रामसेवक प्रशांत दोडके म्हणाले. आम्हाला विश्वासात न घेता मनमानी पद्धतीनं करवाढ करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थ वामन मडावी यांनी केला.

यासंदर्भात पोलिसांनी सांगितलं की, आम्ही ग्रामस्थांची समजूत काढली. त्यामुळं त्यांनी सर्वांना मुक्त केले. या प्रकरणी कुणीही तक्रार न दिल्यानं कारवाई करण्यात आली नाही. पुढील ग्रामसभा 4 डिसेंबरला होणार आहे. आता गावात शांतता आहे. गावातील वाद निवळल्यानंतर पोलिस परतले आहेत. ग्रामपंचायतीनं मागणी केल्यास देवपायलीत सभेच्या दिवशी बंदोबस्त तैनात करण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितलं.

Edited by : Prasannaa Jakate

Gram Panchayat DevPayli in Chandrapur.
Chandrapur : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना धमकी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com