Chandrapur Shiv Sena : ‘मातोश्री’वरील आदेशांनंतरही चंद्रपुरात गटबाजी कायम

Internal Strife : जातीय राजकारणाचा आरोप करीत विधानसभा समन्वयकाचा राजीनामा
Chandrapur Shiv Sena Leader Nikhil Mandavkar & Ravindra Shinde
Chandrapur Shiv Sena Leader Nikhil Mandavkar & Ravindra Shinde Google

Uddhav Thackerya Group : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोर मातोश्रीवर रंगलेल्या आरोप-प्रत्यारोप नाट्यानंतरही ठाकरेंची सक्त ताकीद देऊनही चंद्रपूर जिल्हा शिवसेनेतील गटबाजी शांत होताना दिसत नाही. अशात वरोरा-भद्रावती विधानसभा मतदार संघाचे युवा समन्वयकानं जातीय राजकारणाचा आरोप करीत नियुक्तीच्या काही तासातच राजीनामा दिलाय.

‘मातोश्री’वरून आलेले सर्व आदेश पायदळी तुडवत हा प्रकार घडला आहे. विधानसभा समन्वयकानं आपला राजीनामा थेट युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनाच पाठविला आहे. त्यामुळं चंद्रपुरातील जिल्हा प्रमुख विरुद्ध विधानसभा प्रमुख असा वाद पुन्हा उफाळला आहे. (Internal Strife In Shiv Sena Uddhav Thackeray Group Of Chandrapur Assembly Coordinator Resigns Within Few Hours Of Appointment)

Chandrapur Shiv Sena Leader Nikhil Mandavkar & Ravindra Shinde
Chandrapur : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना धमकी

चंद्रपूर शिवसेनेतील गटबाजीत प्रचंड वाढ झाल्यानंतर मातोश्री येथे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली होती. बैठकीत ठाकरे यांच्यासमोरच पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड आरोप-प्रत्यारोप झालेत. त्यामुळं संतापलेल्या ठाकरेंनी गटबाजी खपवून घेणार नाही, अशी तंबी सर्वच पदाधिकाऱ्यांना दिली होती. मुंबईवरून परतल्यानंतरही या ठिणगीतील धुर कायम होता. अशात पक्षानं जिल्हापातळीवर काही नियुक्त्या केल्या. त्यात वरोरा-भद्रावती विधानसभा मतदार संघासाठी युवासेना समन्वयक पदावर निखिल मांडवकर यांची नियुक्ती करण्यात आली.

नियुक्ती होत नाही तोच काही तासातच मांडवकर यांनी आपला राजीनामा युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांना पाठवला. चंद्रपूर शिवसेनेत जातीय राजकारण होत असल्याचं त्यांनी राजीनाम्यात नमूद केलं. वरोरा-भद्रावती विधानसभा मतदार संघाचे क्षेत्रप्रमुख रवींद्र शिंदे यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केले. शिंदे कार्यकर्त्यांचं खच्चीकरण करीत असल्याची तक्रार मांडवकरांनी केली. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक म्हणून कामाचा शिंदेंकडे दांडगा अनुभव आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मुकेश जीवतोडे आणि वरोरा विधानसभा मतदार संघाचे प्रमुख रवींद्र शिंदे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून गटबाजी सुरू आहे. हा प्रकार सर्वश्रूत झालाय. धुसफूस सुरू असल्याची माहिती ‘मातोश्री’पर्यंत गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली. परंतु या बैठकीतही ठाकरेंसमक्षच दोन्ही गटांमध्ये चांगलीच ‘तू.. तू.. मै.. मै..’ झाली. त्यामुळं ठाकरेंनी सगळ्यांचेच कान टोचले. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून जे ठरेल ते सर्वांसाठी बंधनकारक असेल, असा आदेश सर्वांना ठाकरेंनी दिला. परंतु त्यानंतरही परिस्थितीत सुधारणा झाल्याचं दिसत नाही.

काही दिवसांपूर्वी बाजार समितीची निवडणूक पार पडली. त्यातही शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात भूमिका घेतली होती. एकनाथ शिंदे बाहेर पडल्यानंतर आधीच शिवसेनेत दोन गट तयार झाले आहेत. अशात चंद्रपुरातील ठाकरे गटातही दोन उपगट परस्परांविरोधात मैदानात उतरले. त्यामुळं बाजार समितीची निवडणूक चांगलीच गाजली.

Chandrapur Shiv Sena Leader Nikhil Mandavkar & Ravindra Shinde
Chandrapur Crime : सीसीटीव्ही पाहिला अन‌् घरफोडीच्या तपासात पोलिसांना आपलाच ‘खाकी’वाला आढळला चोर

लवकरच लोकसभा व विधानसभेची निवडणूक होणार आहे. चंद्रपुरातील वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात शिवसेना ठाकरे गटाची मोठी ताकत आहे. परंतु येथेही गटबाजी व नाराजीनाट्य रंगल्यानं शिवसेनेसाठी आगामी काळ सोपा वाटत नाही. चंद्रपूरचे युवासेना जिल्हाध्यक्ष मनीष जेठानी यांनी याबाबतची आपण माहिती घेणार असल्याचं स्पष्ट केलय. वस्तुस्थिती पक्षातील वरिष्ठांपर्यंत पोहोचविणार असल्याचं ते म्हणाले.

Edited by : Prasannaa Jakate

Chandrapur Shiv Sena Leader Nikhil Mandavkar & Ravindra Shinde
Chandrapur Politics : काँग्रेसनं केलं आंदोलनाचं नियोजन, बीआरएसनं आधीच मारली बाजी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com