Crime News : माजी नगरसेवकाची रवानगी तुरुंगात, तब्बल दोन कोटी देण्याचे न्यायालयाचे आदेश!

Nitin Dhakate Grahak manch court : अपार्टमेंटमध्ये 9 सदनिका तयार करण्याची परवानगी असतानाही 12 सदनिका तयार करून त्या 12 लोकांना विकण्याचा अनोखा प्रताप या माजी नगरसेवकाने केला. न्यायालयाने या माजी नगरसेवकाची रवानगी तुरुंगात केली आहे.
crime News
crime News Sarkarnama
Published on
Updated on

crime News : ग्राहकांची फसवणूक आणि सदनिका विक्रीच्या माध्यमातून गैरव्यवहार करण्याचा प्रकार एका माजी नगरसेवकाच्या चांगलाच अंगलट आहे. जिल्हा ग्राहक मंचाच्या आदेशावरून त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे

विशेष म्हणजे तक्रारदारास जवळपास दोन कोटी रुपये देण्याचे आदेश ग्राहक मंचाने दिले आहेत. याच नगरसेवकास अशाच एका प्रकरणात ग्राहक मंचाने तीन वर्षाची शिक्षा सुनावल्याचीही माहिती आहे. नितीन रामचंद्र धकाते असे माजी नगरसेवकाचे नाव आहे.

भंडारा नगर परिषदेचे माजी नगरसेवकाने नितीन रामचंद्र धकाते यांनी खोकरला भागात साई वात्सल्य अपार्टमेंट निर्मितीचा घाट घातला होता. एका अपार्टमेंट मध्ये नऊ सदनिका तयार करण्याची परवानगी असतानाही बारा सदनिका तयार करून त्या 12 लोकांना विकण्याचा अनोखा प्रताप या माजी नगरसेवकाने केला. सोळा वर्षांपूर्वी सुरू झालेले या अपार्टमेंटचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही.

चार प्रकरणे ग्राहक मंचात

सदनिका विकत घेण्यासाठी पैसे देणाऱ्या ग्राहकांची फसवणूक झाल्याचे लक्षात येतात ग्राहकांनी माजी नगरसेवकाकडे पैसे परत देण्यासंदर्भात तगादा लावला होता. पैसे परत दिले जात नसल्याने या लोकांनी जिल्हा ग्राहक मंचात प्रकरण दाखल केले. काहींनी वैयक्तिक तर काहींनी सामूहीक स्वरुपात प्रकरणे दाखल केली. जवळपास चार प्रकरणे जिल्हा ग्राहक मंचात माजी नगरसेवकाच्या धकाते यांच्या विरोधात असल्याचे समजते.

crime News
MVA News : ठाकरेंना 100 तर शरद पवारांना 80 जागा; महाविकास आघाडीचा फाॅम्युला ठरला?

18 टक्के व्याजासह पैसे परत करा

यातील सुमित कपूर यांच्या प्रकरणात माजी नगरसेवकाला तीन वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. जानेवारी 2023 रोजी जिल्हा ग्राहक मंचाने आदेश पारित केले आहेत. मात्र, पोलिसांकडून अटकेच्या संदर्भात कारवाई करण्याच्या दृष्टीने टाळाटाळ केली जात असल्याने ग्राहक मंचानेही पोलिसांच्या कार्यप्रणालीवर ताशेरे ओढले.

अन्य 14 व्यक्तींच्या प्रकरणांमध्ये जिल्हा ग्राहक मंचाने 18 टक्के व्याजासह जवळपास दोन कोटी रुपयांची रक्कम माजी नगरसेवक यांनी ग्राहकांना परत करावी असा आदेश दिला आहे. मात्र, या आदेशाचे पालन न केल्यामुळे न्यायालयाने माजी नगरसेवक यांचे विरोधात अटक वॉरंट काढाला होता.

पाच ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी

23 जुलै रोजी माजी नगरसेवक धकाते याला न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. 31 जुलै रोजी परत न्यायालयात हजर करण्यात आले. त्याने मंचच्या आदेशाप्रमाणे पैसे भरण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे त्याची पाच ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

(Edited By Roshan More)

crime News
Maharashtra Police News : मोठा निर्णय! वरिष्ठांना मर्जीतील पोलिस अधिकारी अन् अंमलदारांना बदली किंवा बढतीच्या ठिकाणी...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com