Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंचा लुबाडण्याचा प्रयत्न; अपघात झाला..मदत करा, 'त्या' फोनचं वास्तव आलं समोर!

Fake Call Scam Eknath Shinde : अकोल-वाशीमरोडवर आपला अपघात झाला असून मदत करा, अशी मागणी करणारा फोन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आला होता.
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दानशूर आहेत. त्यांना कुणीही मदत मागितली तर ते नाकारत नाही. आम्ही ठाण्याचे रहिवासी आहोत. आमचा अकोल-वाशीमरोडवर अपघात झाला, आम्हाला तातडीची मदत हवी आहे, तातडीने पैशाची गरज असल्याचे सांगून, असे सांगून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट फोन करून त्यांच्याकडून पैसे घेण्याचा प्रयत्न एका व्यक्तीने केला. मात्र, या अपघाताची चौकशी केली असता वेगळेच वास्तव समोर आले.

एकनाथ शिंदे यांना फोन आल्यानंतर त्यांनी घटनास्थळ अकोला जिल्ह्यातील असल्याने माजी आमदार व शिवसेनेचे संपर्क प्रमुख गोपीकिशन बाजोरिया यांच्या कानावर ही घटना घातली. ठाण्यातील रहिवासी असल्याने जमेल तेवढी मदत करण्याची सूचना देखील त्यांना केली.

उपमुख्यमंत्र्यांनी फोन केल्याने बाजोरिया यांनीसुद्धा तेवढ्याच तत्परतेने अपघात स्थळ शोधण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांसह निघाले. जवळपास ४२ किलोमीटर प्रवास केला. संपूर्ण परिसर पिंजून काढला. मात्र भीषण अपघात कुठेच झाला नसल्याचे आढळून आले. या दरम्यान उपमुख्यमंत्र्यांना कॉल करणारी व्यक्ती सतत ठिकाणी बदलवत होती.

Eknath Shinde
Latur News : लाख रुपयाचं नूकसान झालयं, साडेआठ हजाराने काय होतयं साहेब..पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासमोर शेतकऱ्यांची व्यथा!

वेगवेगळी माहिती देत होती. त्यामुळे बाजोरिया यांचा संशय बळावला. त्या व्यक्तीने फोन फेवरून पैसे पाठवण्यास सांगितले. त्यामुळे बायाजोरिया यांचा संशय आणखीच बळवला. त्यांनी शिवसैनिकाचा खाक्या दाखवत त्याला खरे काय दे सांग असे दरडावून सांगितले. त्यानंतर त्याने फोनच बंद करून टाकला.

विशेष म्हणजे फोन करणाऱ्याने अपघाताचे ठिकाण पातूर रोड असले सांगितले होते. सुचनेनुसार बाजोरिया हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. त्यावेळी तेथे कोणीच उपलब्ध नव्हते. आजूबाजूच्यांना विचारणा केली असता असा काही अपघात झाल्याची माहिती कोणाचकडे नव्हती. शेवटी ज्या नंबरवरून उपमुख्यमंत्री शिंदे यांना फोन लावला त्या क्रमांकावर बाजोरिया यांनी संपर्क साधला. तेव्हा सर्व प्रकार समोर आला.

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी अपघाताची खोटी माहिती दिल्याचे समजले. बायोरिया यांनी यांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली.

Eknath Shinde
Nitesh Rane : राजन तेलींचा नितेश राणेंवर वार : भावावरील आरोप आमदार निलेश राणेंना मान्य आहेत का?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com