Farmer Suicide Attempt : भूमी अभिलेख कार्यालयात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न!

Vidarbha Farmer News : अंगावर डिझेल घेतल्याने उडाली एकच खळबळ; जाणून घ्या नेमकं काय कारण?
Farmer Suicide Attempt
Farmer Suicide AttemptSarkarnama
Published on
Updated on

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयात एक खळबळजनक घटना घडली आहे. या ठिकाणी एका शेतकऱ्याने स्वत:च्याच अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. या धक्कादायक घटनेने प्रशासनाची एकच तारांबळ उडाली.

ज्ञानेश्वर पांडुरंग लांडे असं आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव असून आपल्यावर जमीन मोजणीत अन्याय झाल्याचा आरोप या शेतकऱ्याने केला आहे. तसेच यावेळी शेतकऱ्याने आकांत करून न्याय देण्याची मागणी केली.

खामगाव तालुक्यातील आवार येथील शेतकरी(Farmer ) ज्ञानेश्वर पांडुरंग लांडे यांचे पिंपरी गवळी येथे शेत आहे. सदर शेताची मोजणी 18 मार्च 2021 रोजी भूमी अभिलेख अधिकारी खराटे यांनी केली होती. मात्र मोजणी चुकीची झाल्याचा आरोप लांडे यांनी केला होता.

यामुळे 29 जुलै 2023 रोजी त्यांनी हरकत घेतली होती व हरकतीचा सातत्याने पाठपुरावा सुध्दा केला होता. मात्र दखल घेण्यात आली नव्हती. या शेतकऱ्याने वारंवार भूमी अभिलेख कार्यालयाचे उंबरठे झिजवले मात्र दखल घेण्यात आली नाही. (Farmer Suicide attempt)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Farmer Suicide Attempt
Police Constable's Commotion : सत्ताधारी आमदाराचे नाव घेत पोलिस शिपायाचा जिल्हाधिकारी कार्यालयात धुडगूस !

अखेर कंटाळून सोमवारी दुपारच्या सुमारास खामगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयात शेतकरी ज्ञानेश्वर पांडुरंग लांडे यांनी अंगावर डिझेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी हा प्रकार सुरू असतानाच आसपास उपस्थित नागरिकांना ही बाब लक्षात आली आणि त्यांनी सतर्कता दाखवत शेतकऱ्याला धरून खाली बसविले आणि उपस्थित नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला .

दरम्यान अचानक घडलेल्या या घटनेमुळे या भूमी अभिलेख कार्यालयात एकच खळबळ उडाली होती. यावेळी शेतकऱ्याने एकच आकांत करत आपली मागणी लावून धरली. या घटनेमुळे कार्यालयात मोठी गर्दीही झाली होती.

या घटनेची मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले होते. यानंतर संबंधित शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. तर गेल्या अनेक दिवसांपासून भूमी अभिलेख कार्यालयात सावळा गोंधळ सुरू असल्याची चर्चा आहे. याबाबत अनेकजणांनी तक्रारी केल्या आहेत. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली होती. या घटनेमुळे शहरात खळबळ निर्माण झाली आहे.

Farmer Suicide Attempt
Lok Sabha Election 2024 : भाजपचे 'ओबीसी कार्ड', संजय धोटेंपर्यंत येऊन पोहोचला शोध !

याच महिन्यात यवतमाळ(Yavatmal) जिल्ह्यातही एका शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. शेतातील पिकांचे नुकसान झाल्याने वारंवार मागणी करूनही न्याय मिळत नसल्याने यवतमाळ जिल्ह्यातील शेतकर्‍याने थेट आर्णी तहसीलदारांच्या दालनात विषाचा घोट घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. विशेष म्हणजे याप्रकरणी न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यावरच शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यात आल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com