Buldhana : बोरी अडगावचे शेतकरी उतरले रस्त्यावर; सरकारच्या विरोधात संतापाचे कारण..

Farmer's Issue : एसडीओ कार्यालयावर नेला 51 ट्रॅक्टर्सचा मोर्चा; रविकांत तुपकर यांचा पाठिंबा
Farmer's Morcha In Buldhana.
Farmer's Morcha In Buldhana.Sarkarnama
Published on
Updated on

Ravikant Tupkar : खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव येथे शेतकऱ्यांच्या संतापाचा सोमवारी (ता. एक) भडका उडाला. विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले होते. सोमवारी उपोषणाचा सहावा दिवस होता. त्यानंतरही प्रशासनाने लक्ष न दिल्याने आंदोलक एसडीओ कार्यालयावर धडकले. शेतकऱ्यांनी बुलढाणा जिल्ह्यात हे आंदोलन केले.

खामगावात 51 ट्रॅक्टर्सचा भव्य मोर्चा काढण्यात आला. तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर या आंदोलनात सहभागी झालेत. ट्रॅक्टरचा मोर्चा हा उपविभागीय कार्यालयावर येणार असल्याने व्यापक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Farmer's Morcha In Buldhana.
Buldhana : राज्यभरात खळबळ उडविणाऱ्या खामगावातील जीएसटी प्रकरणात राजकीय उडी

जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव गावात खामगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी ग्राम पंचायती समोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. परिसरातील जवळपास 200 पेक्षा अधिक शेतकरी, महिला व पुरुष उपोषणात सहभागी झाले आहेत. यावर्षी परिसरात मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडल्याचे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. परिसरातील मागण्यांसाठी उपोषण करण्याची ही येथील पहिलीच घटना आहे. अनेकांनी या उपोषणाला पाठिंबा दिला आहे.

गेल्या सहा दिवसांपासून उपोषण सुरू असून अद्याप प्रशासनाने त्याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे परिसरातील शेतकरी आता आक्रमक झाले आहेत. सोमवारी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांनी आंदोलन केले. 51 ट्रॅक्टर घेऊन ते खामगावच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकले. गेल्या पाच सहा दिवसांपासून प्रचंड थंडीत दिवसरात्र दीडशे ते दोनशे शेतकरी उपोषण करीत आहे. उपोषण करणाऱ्या सर्वच शेतकऱ्यांचे वय सुमारे 60 वर्षांच्या आसपास आहे. वयाने ज्येष्ठ शेतकरी उपोषणाला बसल्याने संताप वाढत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

परिसरातील तरुण शेतकरीही आता या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. मात्र अद्यापही प्रशासनाने किंवा लोकप्रतिनिधींनी या उपोषणाची दखल घेतलेली नाही. त्यामुळे शेतकरी नेतेही आंदोलनात उतरले आहेत. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनीही आंदोलनाला भेट दिली आहे. आमरण उपोषणाला आपला पाठिंबा असल्याचे त्यांनी जाहीर केले. तुपकर यांनीही उपोषणात सहभाग घेतला.

शेतकरी सरकारच्या अजेंड्यावरच नाही. शेतकऱ्यांना मारून त्यांना खाईत लोटायचे असा चंगच सरकारचा आहे. असेच चित्र संपूर्ण महाराष्ट्रात आहे. बोरी अडगाव येथे बसलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे बघायला प्रशासन व शासनाला वेळ नाही. या शेतकऱ्यांच्या उपोषणाबाबत तोडगा निघाला नाही, तर बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरतील, असा इशाराही रविकांत तुपकर यांनी दिली आहे. त्यामुळे आगामी काळात बोरी अडगाव येथील आंदोलन आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Edited by : Prasannaa Jakate

Farmer's Morcha In Buldhana.
Buldhana : एसटी प्रशासनाच्या दुर्लक्षाचा कळस.. धावत्या एसटीची दोन चाके निखळली

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com