Yavatmal : ‘वाय’ सुरक्षा असलेल्या आमदार नरेंद्र भोंडेकरांच्या ताफ्यातील अपघातावर शंकांचे वलय!

Accident : दिग्रसजवळ ‘एस्कॉर्टिंग’ वाहन आणि ऑटो-दुचाकीत जबरदस्त धडक
Accident To MLA Narendra Bhondekar.
Accident To MLA Narendra Bhondekar.Sarkarnama
Published on
Updated on

MLA Narendra Bhondekar : भंडारा येथील आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या ताफ्यातील वाहनाचा भीषण अपघात घडला. शुक्रवारी (ता. 5) रात्री आठच्या सुमारास हा अपघात यवतमाळ जिल्ह्यात घडला आहे. भोंडेकर यांच्या वाहनाच्या पाठिमागे असलेल्या ताफ्यातील पोलिसांच्या ‘एस्कॉर्टिंग’ वाहनाची ऑटोला जबरदस्त धडक झाली. ऑटोवर भरधाव दुचाकीही धडकली. या अपघातात नऊ जण अत्यंत गंभीर अवस्थेत जखमी झाले आहेत. आमदार नरेंद्र भोंडेकर सुरक्षित आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

आमदार नरेंद्र भोंडेकर आपले स्वीय सहाय्यक संजय शेगोकार यांच्या वडिलांच्या निधनानंतर आयोजित चौदावीच्या कार्यक्रमासाठी यवतमाळ जिल्ह्यात आले होते. दिग्रस तालुक्यातील सावंगा गावाजवळ त्यांचा ताफा आला असताना पोलिसांचे ‘एस्कॉर्टिंग’ वाहन, ऑटो आणि दुचाकी यांची धडक झाली. टायर फुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

Accident To MLA Narendra Bhondekar.
Bhandara : अधिकाऱ्याला पैशांचा मोह नडला, अब्रूही गेली अन् नशिबी तुरुंगवासही घडला

अपघातानंतर संशयाचे वलय

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या ताफ्याला अपघातानंतर संशय निर्माण करणाऱ्या अनेक घडामोडी घडल्या आहेत. शिवसेनेत बंड झाल्यानंतर फुटलेल्या आमदारांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा आहे. त्यानुसार आमदार भोंडेकर यांचा ताफा तयार करण्यात आला आहे. आमदार भोंडेकर यांच्या ताफ्यातील ज्या पोलिस ‘एस्कॉर्टिंग’ वाहनाला अपघात झाला त्याचा क्रमांक MH36 पासून सुरू होतो. नियमानुसार जिल्हा बदलला की सुरक्षा ताफ्यातील वाहने बदलतात. संबंधित जिल्ह्यातील पोलिसांना त्या त्या भागातील रस्त्यांची परिपूर्ण माहिती असते.

संबंधित जिल्ह्यांची ‘वायरलेस फ्रिक्वेन्सी’ही त्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना बारकाईने माहिती असते. त्यामुळे हा नियम तयार करण्यात आला आहे. परंतु नागपूर, वर्धा असे दोन जिल्हे ओलांडत यवतमाळपर्यत पोहोचलेली MH36 सिरीजच्या ‘एस्कॉर्टिंग’ वाहनामुळे पोलिस दलात चर्चेला उधाण आले आहे. जिल्हाबदल करताना आमदार भोंडेकर किंवा ताफ्यातील सुरक्षा प्रभारी अधिकाऱ्याने आम्हीच भंडारा ते यवतमाळ ‘एस्कॉर्टिंग’ करणार, आम्हाला नागपूर आणि वर्धा येथील ‘एस्कॉर्टिंग’ वाहन नको, असे रितसर संबंधित जिल्ह्यांच्या पोलिस अधीक्षक व नियंत्रण कक्षाला कळविले होते काय, असा प्रश्नही आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

‘वाय’ ते ‘झेड प्लस’ अशी कोणतीही सुरक्षा असलेले व्यक्ती एका जिल्ह्यातून दुसरीकडे प्रवास करताना संबंधित जिल्ह्याच्या पोलिस नियंत्रण कक्षाला व्हीआयपींच्या वाहनांच्या ताफ्याचे ‘लोकेशन’ आणि ‘मुव्हमेंट’ची माहिती दिली जाते. आमदार भोंडेकर यांच्या ताफ्याने हा ‘प्रोटोकॉल’ पाळला काय, असा प्रश्नही आता यवताळ पोलिसांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे या अपघात प्रकरणी आता भंडारा, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या चारही जिल्ह्यातील पोलिस अधीक्षकांना विचारणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अपघातानंतर जमाव हल्ला करेल या भीतीने आमदार नरेंद्र भोंडेकर व त्यांच्या ताफ्यातील पोलिस गायब झाल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला. दिग्रस पोलिस घटनास्थळी पोहाचेले त्यावेळीही भोंडेकर किंवा त्यांच्या सुरक्षा ताफ्यातील पोलिस अपघातस्थळी नव्हते, असे दिग्रस पोलिसातील अधिकाऱ्यांनी सांगितले. अपघातानंतर संबंधित ‘व्हीआयपी’च्या सुरक्षा ताफ्यातील पोलिसांनी ‘वायरलेस’ प्रणाली किंवा फोनवरून त्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला देणे अपेक्षित असते. हा नियम बंधनकारक आहे. असे असतानाही पोलिस नियंत्रण कक्ष किंवा दिग्रस पोलिसांना याबाबत अपघातग्रस्त ताफ्याकडून अधिकृत कळविण्यात आले नव्हते, असेही पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

Accident To MLA Narendra Bhondekar.
Yavatmal : अजित पवारांची दादागिरी? पालकमंत्र्यांनाही कळले नाही अन‌्....

भोंडेकर यांच्या ताफ्यातील वाहन हे कालबाह्य असल्याचा दावाही या जबाबदार अधिकाऱ्याने केला. नियमानुसार कालबाह्य वाहन सुरक्षा असलेल्या व्यक्तींच्या ताफ्यात देता येत नाही. विशेष म्हणजे आमदारांना पुरविण्यात आलेल्या ‘वाय’ दर्जाची सुरक्षेचा कालावधी अपघात घडला, त्यावेळी कायम होता की त्याची मुदत संपलेली होती, याबाबतही पोलिस यंत्रणेत दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. अपघाताबाबत यवतमाळचे पोलिस अधीक्षक प्रवीण बनसोड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती परिपूर्ण घ्यावी लागेल असे उत्तर दिले.

Edited by : Prasannaa Jakate

Accident To MLA Narendra Bhondekar.
Yavatmal : रईस चित्रपटातील पेहराव अन् तलवार घेत आमदार नाईकांचा ‘अलमिडो..’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com