Jitendra Awhad On Shri Ram
Jitendra Awhad On Shri RamSarkarnama

Hate Speach : श्रीरामाच्या भक्तांचा संताप; जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल

Yavatmal Police : शिर्डी, पुणे, मुंबई पाठोपाठ पुसदमध्ये कारवाई
Published on

Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाो आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर श्रीराम भक्तांचा कोप झाला आहे. श्रीरामाला मांसाहारी संबोधल्याबद्दल आमदार आव्हाड यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिर्डी, पुणे, मुंबईनंतर पाठोपाठ आता यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथेही भारतीय दंड संहितेच्या कलम 295 (A) नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आव्हाड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

आमदार आव्हाड यांनी श्रीरामावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर खेद व्यक्त करतो. भाजप निवडणुकीसाठी श्रीराम आणत आहेत, पण आमचा राम आमच्या हृदयात आहे. सत्य कितीही कटू असले तरी जनभावना लक्षात घेऊन आपण खंत व्यक्त करत आहो. हिच शिकवण आपल्याला शरद पवार यांनी दिली आहे. असा खुलासाही त्यांनी केला आहे. त्यानंतरही हा वाद थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे.

Jitendra Awhad On Shri Ram
Jitendra Awhad News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात राज्यात पहिला गुन्हा दाखल

याच प्रकरणात भावना दुखावल्याचा आरोप करीत शिर्डी, पुणे, मुंबई या तीन ठिकाणी आमदार जीतेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल झाला आहे. आता पुसद पोलिसांनीही याप्रकरणाची कायदेशीर नोंद केली आहे. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे कार्यकर्ते निलेश बाबुराव पेन्शनवार यांनी पुसद शहर पोलिस ठाण्यात यासंदर्भात रीतसर तक्रार केली आहे. तक्रारीत त्यांनी आव्हाड यांनी प्रभू श्रीरामाबद्दल अनुद्गार काढत धार्मिक भावना दुखावल्याचे म्हटले आहे. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आमदार आव्हाड यांच्याविरुद्ध कारवाई केली आहे.

आमदार आव्हाड यांच्या वक्तव्याने त्यांच्याविरोधात राज्यात सातत्याने गुन्हा दाखल होत आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत सतत वाढत आहेत. अयोध्येतील श्रीराम मंदिरात अभिषेक सोहळ्याच्या दिवशी म्हणजे 22 जानेवारीला महाराष्ट्रात मद्य आणि मांस विक्रीवर एक दिवसाची बंदी घालण्याचे आवाहन भाजप आमदार राम कदम यांनी महाराष्ट्र सरकारला केले होते. त्यानंतर शिर्डीत दोन दिवसीय कार्यकर्ता परिषदेला संबोधित करताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. या वक्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटले. जवळपास सर्वच हिंदुत्ववादी संघटनांनी आव्हाड यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिर्डी, पुणे, मुंबईनंतर आणि दिग्रसमध्ये दाखल झालेल्या या गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी अंतिम दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केल्यास आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सातत्याने शिर्डी, पुणे, मुंबई, दिग्रस न्यायालयाच्या चकरा माराव्या लागणार आहेत. आता चारही ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तपासानंतर पोलिस यासंदर्भात न्यायालयात कोणते दोषारोपपत्र दाखल करतात त्यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी अवलंबून आहेत.

Edited by : Prasannaa Jakate

Jitendra Awhad On Shri Ram
Jitendra Awhad on Lord Ram : राम मांसाहारी असल्याबाबत माझ्याकडे पुरावे; आव्हाडांनी दिला रामायणाचा दाखला..

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com