FIR against DDR : चक्क डीडीआरसह पाच जणांवर फसवणुकीचे गुन्हे !

Ten crores land released for one crore : दहा कोटींची जमीन एक कोटी रिलीज, राजाश्रय कुणाचा ?
Crime
Crime Sarkarnama
Published on
Updated on

Crime News : बाबाजी दाते महिला सहकारी बँकेकडून कोट्यवधीचे कर्ज उचलणाऱ्या फर्मला कर्जातून मुक्ती देण्यासाठी बँकेवर अवसायक असलेल्या सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधकाने सहकार न्यायालयात न्यायप्रविष्ठ असलेल्या लवाद दावा मागे घेण्याबाबत लिखित आदेश दिले. पत्रात कुठूलाही उल्लेख न करता अन्य तिघांच्या संगनमतातून लवाद मागे घेण्याची कारवाई केली. कर्ज खात्याला गहाण असलेली स्थावर मालमत्ता रिलिज करण्यासाठीही पत्र दिले. रिलिज डीड करून देण्याचा प्रताप करून पदाचा दुरुपयोग करीत बँकेला कोट्यवधीने फसविल्याची तक्रार बँकेच्या माजी उपाध्यक्षांनी अवधूतवाडी पोलिसांत केली. त्यावरून जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांच्यासह पाच जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. आता गुन्हा दाखल झाल्यानंतर दहा कोटींची जमीन एक कोटीत रिलीज करणाऱ्या आरोपींना राजाश्रय कुणाचा होता, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ॲड. मनीषा प्रदीप कुळकर्णी (51) रा. श्रद्धानगर असे फिर्यादीचे नाव आहे तर नानासाहेब सयाजीराव चव्हाण (40) असे जिल्हा उपनिबंधक तथा बाबाजी दाते महिला सहकारी बँकेचे अवसायक, अनुपमा आनंदराव जगताप (60), अतुल आनंदराव जगताप (45), सचिन साहेबराव जगताप (45) रा. शिवाजीनगर यवतमाळ, राजेंद्र लक्ष्मणराव वरटकर (53) रा. भाग्योदय सोसायटी श्रद्धानगर रोड वडगाव अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत. मनीषा कुळकर्णी या बँकेच्या उपाध्यक्षा आहे. पुण्यातील सहकार आयुक्तांच्या 11 नोव्हेंबर 2022 च्या आदेशाने डीडीआर नानासाहेब चव्हाण यांची महिला बँकेवर अवसायक म्हणून नियुक्ती झाली. त्यामुळे बँकेतील संपूर्ण व्यवहाराचे अधिकार चव्हाण यांच्याकडे आहे. आजमितीस बँकेची कर्जवसुली, दैनंदिन व्यवहार व कामाचे नियमन हे सर्व अधिकार चव्हाण यांच्याकडे आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Crime
Konkan Politics : ठाकरे गट आमदाराच्या ऑफिसमध्ये दगड अन् शिगांचा खच; भाजप नेत्याच्या आरोपाने खळबळ...

गैरअर्जदार अनुपमा व अतुल जगताप हे ए. जी. जगताप फर्मचे भागीदार असल्याचे कुळकर्णी यांनी फिर्यादीत नमूद केले. यातील एक भागीदार आनंदराव जगताप यांचा मृत्यू झाला. जगताप व त्यांच्या भागीदारांकडे असे एकूण 1 फेब्रुवारी 2024 रोजी जवळपास 10 कोटी कर्ज थकबाकी राहिली. बँकेकडून कर्ज घेताना तारण म्हणून नोंदणीकृत काही मालमत्ता गहाण ठेवल्या. त्या मालमत्तांचा कुळकर्णी यांनी तक्रारीत संपूर्ण उल्लेख केला आहे. हे सर्व दस्त बँकेच्या ताब्यात आहे.एकंदरीत 10 कोटींची थकबाकी असताना डीडीआर व बँकेचे अवसायक नानासाहेब चव्हाण यांनी 28 नोव्हेंबर 2023 रोजी अवसायकाचे सल्लागारांना सहकार न्यायालयातील न्यायप्रविष्ठ लवाद दावा लिखित पत्र देऊन संयुक्तिक कारण न देता मागे घेण्याबाबत आदेशित केले. याबाबत अवसायकाला कायदेशिर व लेखी सल्ला सल्लागारांनी दिला नसल्याचे तक्रारीत कुळकर्णी यांनी नमूद केले आहे. त्यातूनच मागे घेण्याची कारवाई करण्यात आल्याचा कुळकर्णी यांचा आरोप आहे. न्यायालयात पुरावा गोळा करण्याच्या टप्प्यावर पोहचला असताना गैरअर्जदारांनी संगनमतातून बँकेची फणवणूक केल्याचा आरोपही केला आहे.

मालमत्ता रिलिजसाठी दिले लेखी पत्र

डीडीआर चव्हाण यांनी गैरअर्जदार वरटकर यांना लेखी पत्र देऊन बँकेच्या मार्इंदे चौक शाखेतून कर्जदार सचिन जगताप यांनी उचललेले एक कोटी 20 लाखांचे कर्ज खात्याचा बोझा कमी करण्याचा असल्याने गहाण स्थावर मालमत्ता रिलिज करून देण्याचे आदेशित केले. वास्तविक सचिन हे फर्ममधील एक भागीदार आहेत. त्यांनी उचललेल्या कर्जाची परतफेड केली नसताना डीडीआर चव्हाण यांनी मालमत्ता रिलिजचे आदेश दिल्याचा आरोप कुळकर्णी यांनी केला आहे. 1 फेब्रुवारी 2024 रोजी वरटकर यांनी फर्मच्या भागीदार अनुपमा जगताप यांच्या हक्कात रिलिज डीड करून दिले. सदरचा दस्त यवतमाळच्या दुय्यम निबंधकांनी नोंदविला. एकंदरीत अवसायक असतानाही डीडीआरने या प्रक्रियेत सहभाग घेतल्याने बँकेसह सभासद व ठेविदारांची फसवणूक झाली. त्यावरून या प्रकरणात अवधूतवाडी पोलिसांनी भादंवि 420, 468,471, 474,34,120 बी कलमान्वये गुन्हे नोंदविले आहे.

अवसायकाचा भ्रमणध्वनी बंद

महिला बँकेच्या कर्जदार फर्मकडे बँकेचे कोट्यवधी थकीत असताना बँकेचे अवसायक तथा डीडीआर नानासाहेब चव्हाण यांनी रिलिज डीडसाठी पत्रव्यवहार केला. त्यामुळे अवधूतवाडी पोलिसांनी त्यांच्यासह पाच जणांवर गुन्हेही नोंदविले. या प्रकरणात जगताप फर्मसह डीडीआर चव्हाण यांची बाजू ऐकून घेण्यासाठी डीडीआर चव्हाण यांना भ्रमणध्वनीद्बारे संपर्क साधला. मात्र, त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता. त्यामुळे या प्रकरणातील दुसरी बाजू सत्य काय, हे स्पष्ट होऊ शकले नाही.

Crime
Raosaheb Danve and Ashok Chavan : रावसाहेब दानवेंच्या दिल्लीतील बंगल्यात अशोक चव्हाणांचे 'Grand Welcome'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com