Nagpur Firing : आर्थिक व्यवहाराच्या वादातून आरटीओ अधिकाऱ्यांमधील फायरिंगची घटना

Gita Sejwal Case : दोन वर्षांनंतर गोळीबार प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याने संशयाचे वलय
Nagpur RTO Office
Nagpur RTO OfficeSarkarnama
Published on
Updated on

Financial Dispute : दोन आरटीओ निरीक्षकांमध्ये नागपुरात झालेले गोळीबाराचे प्रकरण आर्थिक व्यवहारातून घडल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. सध्या अहमदनगरमध्ये कार्यरत असलेल्या आरटीओ निरीक्षक गीता शेजवळ यांनी निरीक्षक संकेत गायकवाड यांच्यावर आपल्या ‘सर्व्हिस रिव्हॉल्व्हर’मधून गोळी झाडल्याचे तपासात पुढे आल्याचे पोलिसांनी सांगितले.

गोळीबारप्रकरणी गीता शेजवळ यांच्याविरोधात प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जखमी झालेले आरटीओ निरीक्षक संकेत गायकवाड पिंपरी चिंचवडमध्ये कार्यरत असून त्यांच्याविरोधात पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. राज्यातील परिवहन विभागावर गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक गैरव्यवहारांमुळे टीका होते. या गोळीबाराच्या घटनेमुळे परिवहन विभाग पुन्हा एकदा चर्चेत आले आले आहे.

Nagpur RTO Office
Nagpur RTO : नागपूरमध्ये आरटीओ अधिकारी बदल्यांचे रॅकेट? पंचतारांकित हॉटेलमध्ये काय शिजलं?

संकेत गायकवाड यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर आरटीओतील एका अधिकाऱ्याने पोलिसांना कळविण्याऐवजी गायकवाड यांना आपल्या नात्यातील एका डॉक्टरकडे नेले. या डॉक्टरने गायकवाड यांच्या पायातील गोळी काढली. आरटीओ विभाग आणि पोलिसांना अंधारात ठेवत करण्यात आलेल्या या प्रकारामुळे आता संबंधित अधिकारी आणि डॉक्टरचीही चौकशी पोलिस करणार आहेत.

आरटीओ अधिकारी व डॉक्टरची चौकशी केल्यानंतर कदाचित या प्रकरणातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. संबंधित आरटीओ अधिकारी आणि डॉक्टरविरोधातही पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो, असे पोलिसांचे म्हणणे आहे. प्रथमदर्शनी गोळीबाराचे हे प्रकरण आर्थिक कारणामुळे घडल्याचे सांगण्यात येत असले तरी सखोल तपासानंतर या प्रकरणातून अनेक धक्कादायक बाबी पुढे येऊ शकतात, असे पोलिसांना वाटत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

संकेत गायकवाड आणि गीता शेजवळ प्रकरणाचा तपास पुढे सरकू नये, यासाठी पुण्या-मुंबईतील काही ‘गॉडफादर्स’नी प्रयत्न सुरू केले आहे. नागपूरचे प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप करणाऱ्या गीता शेजवळ याच आता आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या झाल्याने परिवहन विभागातील अधिकाऱ्यांचे कुरघोडीचे राजकारण यामागे आहे काय, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

Nagpur RTO Office
RTO : आरटीओ निरीक्षकासह दलाल एसीबीच्या जाळ्यात, चेकपोस्‍टवर करत होते अवैध वसुली !

गुंतागुंतीच्या अनेक कड्या

कांद्री सीमा तपासणी नाक्यावर अ‍ॅन्टीकरप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी 4 मे 2023 रोजी छापा टाकला होता. सापळा रचून काही खासगी व्यक्तींना लाच घेताना पकडण्यात आले होते. आरोपींनी त्यावेळी आरटीओ अधिकारी गीता शेजवळांसाठी लाच घेतल्याचे सांगितले होते. कारवाई झाली त्यावेळी घटनास्थळी शेजवळ मात्र नव्हत्या. शेजवळांनी पळ काढल्याचे आरोपींनी एसीबीच्या अधिकाऱ्यांना सांगितले होते.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्या स्तरावर चौकशी करून नागपूरच्या प्रादेशिक परिवहन विभागाला शेजवळ यांना निलंबित करण्याबाबत पत्र दिले. एसीबीच्या या कारवाईनंतर नागपुरातील आरटीओ अधिकारी रवींद्र भुयार यांच्यावरील आरोप-प्रत्यारोपाचे प्रकरण चांगलेच गाजले. भुयार यांच्याविरोधात विनयभंग केल्याप्रकरणी सीताबर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. जुलै 2023 मधील हे प्रकरण होते. त्यानंतर पुन्हा डिसेंबर 2023 मध्ये शेजवळ निलंबन प्रकरणाचे जोर धरला. काँग्रेसने या वादात उडी घेतली.

Nagpur RTO Office
`आरटीओ`चे सर्वपक्षीय राजकीय नेत्यांशी लागेबांधे?

नागपूर कार्यालयाने राज्याच्या परिवहन खात्याला शेजवळ यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठवला. परंतु निलंबनाचा प्रस्ताव अद्यापही प्रलंबित आहे. आता 2022 मधील गोळीबार प्रकरणात शेजवळ यांच्या नावाने 2024 मध्ये गुन्हा दाखल झाला आहे. यासंदर्भातही नागपूर पोलिसांनी परिवहन विभागाला कळविले आहे. त्यामुळे शेजवळ यांना निलंबित करण्याचा मुद्दा पुन्हा एकदा पुढे आला आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने 2023 मध्ये शेजवळ प्रकरणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले होते. यासंदर्भात 18 डिसेंबर 2023 रोजी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांना पत्र पाठवून शेजवळ या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पाठबळ असल्याचा दावा करीत असल्याचा आरोपही काँग्रेसने केला होता. राजकीय हस्तक्षेपामुळेच आरटीओमधील भ्रष्टाचार फोफावल्याचा आरोपही काँग्रेसने केला होता.

Nagpur RTO Office
मोठी बातमी : परब यांचे निकटवर्ती आरटीओ अधिकारी खरमाटे अडचणीत

मध्यंतरीच्या काळात नागपूर आरटीओमध्ये कमालीची शांतता होती. मात्र अचानक 2022 मधील गोळीबार प्रकरणाने 2024 मध्ये डोके वर काढले. त्यामुळे परिवहन विभागात कुठेतरी पाणी मुरतेय आणि त्याचे तार पुणे, मुंबईमार्गे व्हाया परिवहन विभाग असे नागपूर पोलिसात जुळत असल्याचे बोलले जात आहे. असे असेल तर नागपूर आयटीओमधील एक एक करीत इतिहासजमा झालेली प्रकरणे पुढे येतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. नागपूरच्या एका गल्लीत असलेल्या आरटीओ कार्यालयात सुरू झालेला दोन अधिकाऱ्यांचा हा वाद मंत्रालयाच्या कोणत्या मजल्यापर्यंत पोहोचतो, हे सखोल तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

Edietd By : Prasannaa Jakate

R...

Nagpur RTO Office
परब प्रकरणात 'ईडी' सक्रीय; आरटीओ अधिकाऱ्याच्या घरासह तीन ठिकाणे छापे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com