Gram Panchayat : उपसरपंच गब्बरचा गेम करण्यासाठी चक्क चार लाखांची सुपारी

Political Crime : विदर्भातील ‘काँट्रॅक्टर किलिंग’च्या प्रयत्नाची दुसरी घटना
Mangrul Firing Case
Mangrul Firing CaseSarkarnama
Published on
Updated on

Nagpur : वैमनस्यातून राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तीच्या ‘काँट्रॅक्टर किलिंग’चा प्रयत्न करण्यात आल्याची दुसरी घटना विदर्भात घडली आहे. गोंदियातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक यांना मारण्यासाठी 40 लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याचे प्रकरण ताजे असतानाच नागपुरातील मांगरूळचे उपसरपंच गब्बर देवराव रेवतकर (वय 42) यांना गोळ्या घालण्यासाठी 4 लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

रेवतकर यांच्यावरील गोळीबार प्रकरणाचा छडा गुन्हे शाखा पोलिसांनी लावला आहे. याप्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली आहे. गोळीबार प्रकरणाचा सूत्रधार अमोल ऊर्फ रामेश्वर विठ्ठल गंधारे (वय 30, रा. मांगरूळ), कार्तिक रामेश्वर पंचबुद्धे (वय 26) आणि लक्ष्मण तुकाराम राठोड (वय 40, रा. तैलकवडसी, ता. उमरेड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

Mangrul Firing Case
Gondia Shoot Out : यादव गोळीबार प्रकरणातील बंदूक जप्त; आणखी दोन जेरबंद

ग्राम पंचायत निवडणुकीतून रेवतकर यांच्या ‘काँट्रॅक्टर किलिंग’चा प्रयत्न करण्यात आला आहे. गब्बर यांनी निवडणुकीत अमोलला पराभूत केले होते. त्याचा राग अमोलच्या मनात होता. त्यामुळे गब्बर यांचा ‘गेम’ करण्यासाठी अमोलने मारेकऱ्यांना चार लाख रुपयांची सुपारी दिली होती. अमोल हा अवैध मद्यविक्रीही करतो. गब्बर यांनी यासंदर्भात अमोलची पोलिसात तक्रारही केली होती. त्यामुळे अमोलचे कार्तिक आणि लक्ष्मण यांच्या मदतीने रेवतकर यांचा काटा काढण्याचा कट रचला.

ज्या पद्धतीने गोंदियात माजी नगरसेवक लोकेश ऊर्फ कल्लू यादव यांच्यावर गोळ्या झाडण्यापूर्वी मारेकऱ्यांनी त्यांच्यावर ‘वॉच’ ठेवला अगदी तशाच पद्धतीने मांगरूळ गोळीबार प्रकरणातील मारेकऱ्यांनीही रेवतकर यांच्यावर नजर ठेवली. रेवतकर दररोज काय करतात, कुठे जातात, त्यांच्या सोबत कोण असते याची माहिती मारेकऱ्यांनी गोळा केली. त्यानुसार फायरिंगचा दिवस ठरला. रेवतकर यांना मारण्यासाठी देशी कट्टा मागविण्यात आला. मंगळवारी गब्बर पहाटे ‘मॉर्निंग वॉक’ला निघतील हे मारेकऱ्यांना ठाऊक होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मंगळवारचा दिवस गब्बरच्या आयुष्यातील शेवटचा दिवस ठरेल असे मारेकऱ्यांनी ठरविले. ‘मॉर्निंग वॉक’वरून गब्बर घरी परत जात असताना कार्तिक व लक्ष्मण दुचाकीवरून आलेत व त्यांनी गावठी बंदुकीतून गब्बरवर फायरिंग केले. नशित बलवत्तर असल्याने गोळी गब्बर यांच्या गालाला चाटून गेली. घटनेनंतर मारेकरी फरार झालेत. याप्रकरणी उमरेड पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदविला.

नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी गुन्हे शाखा पोलिसांना तपासाचे आदेश दिले. पोलिस निरीक्षक ओमप्रकाश ठाकूर, सहाय्यक पोलिस निरीक्षक वाघ, चंद्रशेखर घडेकर, हेडकॉस्टेबल भगत, मयूर ढेकले, गजेंद्र चौधरी, रंजित जाधव, सुमित बागडे, आशुतोष यांनी शोधाला सुरुवात केली. तपासात गोळीबारामागील अनेक कारणांचा शोध घेण्यात आला. त्यातून पोलिसांचा संशय अमोल गंधारेबाबत बळावला.

Mangrul Firing Case
Gondia Shoot Out : माजी नगरसेवक यादव यांना मारण्यासाठी 40 लाखांची सुपारी

पोलिसांनी अमोलभोवती फास आवळला. अमोलनचे गब्बर यांना मारण्यासाठी सुपारी दिल्याचे ठोस पुरावे मिळताच पोलिसांनी त्याला उचलले. अमोलला पोलिसांच्या ‘बाजीराव’चा हिसका बसताच तो पोपटासारखा बोलू लागला व त्याने गुन्हा कबूल केला. अमोलविरुद्ध अवैध मद्यविक्री, देहव्यापार, अपहरण अशा स्वरुपाचे गुन्हे आहेत. लक्ष्मणविरुद्धही बेला पोलिस ठाण्यात खुनाचे दोन गुन्हे दाखल आहेत.

Edited By : Prasannaa Jakate

Mangrul Firing Case
Gondia Shoot Out : यादव गोळीबार प्रकरणातील बंदूक जप्त; आणखी दोन जेरबंद

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com