Youth Congress
Youth CongressSarklarnama

Youth Congress Politics : सरसंघचालकांच्या विरोधातील आंदोलनाला दांडी; युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांवर 'ही' झाली मोठी कारवाई

RSS Mohan Bhagwat Nagpur Youth Congress office bearers dismissed : प्रदेश युवक काँग्रेसच्या नागपूरमधील पाच डझन पदाधिकाऱ्यांना तडकाफडकी पदमुक्त करण्याचे कारण आलं समोर.
Published on

Nagpur News : प्रदेश युवक काँग्रेसच्या सुमारे पाच डझन पदाधिकाऱ्यांना तडकाफडकी पदमुक्त करण्यात आले आहे. त्यांच्यावर निष्क्रियतेचा ठपका ठेवण्यात आला आहे. मात्र यामागचे खरे कारण आता समोर आले आहे.

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विरोधात करण्यात आलेल्या आंदोलनात जे पदाधिकारी सहभागी झाले नाहीत, त्यांना तडकाफडकही पदावरून हटवण्यात आल्याचे समोर आले आहे.

सरसंघचालक (RSS) मोहन भागवत यांनी अयोध्येतील राम मंदिराची उभारणी झाली तेव्हापासून खऱ्या अर्थाने भारताला स्वातंत्र मिळाले असल्याचे व्यक्तव्य केले होते. या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी रविवारी महाल येथील संघमुख्यालयाच्या समोर युवक काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले होते.

Youth Congress
Uday Samant : 'वडेट्टीवारांचा वेगळा खटाटोप, वेळ आल्यावर...'; उदय सामंत यांचा 'इथिक्स' पाळून असल्याचा इशारा (पाहा VIDEO)

आंदोलनात युवक काँग्रेसचे (Congress) राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब आणि राष्ट्रीय महासचिव अक्षय चिकारा यांच्यासह प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत सहभागी झाले होते. तत्पूर्वी राष्ट्रीय अध्यक्षांनी देवडिया येथे युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. त्यानंतर आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला.

Youth Congress
Youth Congress Politics : बड्या नेत्यांच्या चिरंजीवांना युवक काँग्रेसचा झटका; पाच डझन पदाधिकारी पदमुक्त

या बैठकीला अनेक पदाधिकारी अनुपस्थिती होते. याशिवाय अनेकजण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांच्या विरोधात आंदोलनातसुद्धा सहभागी झाले नव्हते. सुमारे पन्नास कार्यकर्तेच आंदोलनासाठी आले होते. एका अर्थाने हे आंदोलन फसले. राष्ट्रीय अध्यक्ष भानू चिब आणि राष्ट्रीय महासचिव चिकारा यांनी याची गंभीर दखल घेतली. त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांयी यादीच मागितली. जे आंदोलनात सहभागी झाले नाही त्यांची नावे काढून पदमुक्त करण्याच थेट आदेश काढला.

या पदाधिकाऱ्यांना केलं पदमुक्त...

पदमुक्त करण्यात आलेल्यांमध्ये प्रदेश उपाध्यक्ष तनवीर विद्रोही, महासचिव आकाश गुजर, पंकज सावरकर, केतन ठाकरे, शिवानी वडेट्टीवीर, आमिर शेख, सचिव सतीश वारजूकर, अनुराग भोयर, अक्षय हेटे, रिजवान बेग, मोहम्मद कादर, तौसिफ अहमद, रौनक चौधरी, अभिषेक धवड, हेमंत कातुरे, सुमित ढोलके, नागपूरचे जिल्हाध्यक्ष मिथिलेष कन्हेरे, पूर्व नागपूर अध्यक्ष भावेश तलमले, सावनेरचे अध्यक्ष राजेश खंगारे, कामठीचे अध्यक्ष सलामत अली, काटोलचे अध्यक्ष विनोद नोकरिया, हिंगण्याचे अध्यक्ष फिरोज शेख, उमरेडचे अध्यक्ष गुणवंत मांढरे अशा एकूण 60 जणांना पदमुक्त करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com