Wardha Anil Deshmukh : 'साहेबांना' संपविण्यासाठी 'दादांचा' होतोय वापर

Yuva Sangharsha Yatra : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा वर्धा येथे गौप्यस्फोट
Anil Deshmukh, Sharad Pawar & Ajit Pawar.
Anil Deshmukh, Sharad Pawar & Ajit Pawar.Google
Published on
Updated on

चेतन व्यास

Sharad Pawar & Ajit Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडत अजित पवार यांनी वेगळी चूल का मांडली हे सर्वांनाच ठाऊक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राजकारणातून संपवित घरी बसवायचं आहे. त्यासाठी भाजपनं अजित पवार गटाला मोठी सुपारीच दिली आहे. त्यातून पक्षात फुटीचं राजकारण सुरू असल्याचा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला.

आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेच्या निमित्तानं देशमुख गुरुवारी (ता. 30) वर्धा येथे आले होते. त्यावेळी ते बोलत होते. (Former Home Minister Anil Deshmukh Claims BJP Has Hire Ajit Pawar Group To Finish Political Career Of NCP Chief Sharad Pawar)

Anil Deshmukh, Sharad Pawar & Ajit Pawar.
Amravati Anil Deshmukh : राज्याच्या मंत्रिमंडळातील विसंवादच संघर्षाला कारणीभूत

अजित पवार हे भाजपसोबत जाण्याचं काहीच औचित्य नव्हतं. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पूर्ण स्वातंत्र्य होतं. भाजपनं वेगवगळे आरोप करीत आपल्याला कारागृहात डांबलं. राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांना आपल्या नावानं धमक्याही दिल्या. ‘तुमचा अनिल देशमुख करून घ्यायचा नसेल, तर सोबत या..’ अशा या धमक्या होत्या. यामागे एकच हेतू आहे, तो म्हणजे ‘साहेबांचं’ राजकीय वर्चस्व भाजपला पूर्णपणे संपवायचं आहे. त्यासाठी भाजपनं दादांच्या गटातील काहींना सुपारीच दिली आहे.

पक्षात फूट पडल्यानंतर जे राष्ट्रवादीचे व ‘साहेबांचे’ खरे समर्थक, हितचिंतक होते ते सोबत राहिले आहेत. आता आम्ही निवडणूक आयोगापुढं हा लढा देत आहोत. आम्हाला नक्कीच न्याय मिळेल असा विश्वास आहे. संपूर्ण देशाला माहिती आहे, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना कुणी केली. त्यामुळं कुणी कितीही खोटे पुरावे सादर केले तरी जनता कोण बरोबर आणि कोण चुकीचं हे नक्कीच ओळखते. चुकीची कामं करणाऱ्यांना जनता निवडणुकीत जागा नक्की दाखवेल, असा विश्वासही देशमुख यांनी व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

छगन भुजबळ यांच्यावर टीका करताना देशमुख म्हणाले की, कॅबिनेट मंत्र्यांनी आदेश द्यायचे असतात. मंत्रीच जर मागण्या करीत बसले, निवेदनं देत बसले तर सामान्य जनतेने कुणाच्या तोंडाकडं बघावं. मंत्र्यांचं काम असते कॅबिनेटच्या बैठकीत बोलणं. मात्र, भुजबळ या बैठकी सोडत जाहीरपणे मागण्या करीत आहेत. महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ म्हणजे एक ना धड भाराभार चिंध्या अशा स्वरूपाचं आहे. सरकारमध्ये कोण सगळे निर्णय घेत आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. परंतु सत्तेसाठी अशा पद्धतीची लाचारी पत्करणे शोभते काय, असं नमूद करीत अनिल देशमुख यांनी कुणाचंही नाव न घेता टीका केली.

Edited by : Prasannaa Jakate

Anil Deshmukh, Sharad Pawar & Ajit Pawar.
Akola Anil Deshmukh : शिंदे, फडणवीस अजितदादांना ‘साइड ट्रॅक’ करताहेत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com