भाजपचा माजी आमदार म्हणतोय, पक्षात माझी गळचेपी सुरू आहे...

येत्या काळात भंडारा (Bhandara) भाजपमध्ये (BJP) राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तीन गट सक्रिय झाले आहेत.
Charan Waghmare, Parinay Fuke and Sunil Mendhe
Charan Waghmare, Parinay Fuke and Sunil MendheSarkarnama
Published on
Updated on

भंडारा : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या आधीपासूनच भारतीय जनता पक्षात (BJP) गटबाजी उफाळली होती. आज माजी आमदार चरण वाघमारे (Charan Waghmare) यांच्या वक्तव्यानंतर अखेर गटबाजी चव्हाट्यावर आली. भंडारा (Bhandara) भाजपमध्ये तीन गट सक्रिय झालेले असताना एका गटाने उघडपणे आपल्या होणाऱ्या खच्चीकरण जाहीर वक्तव्य केले आहे. पक्षात होणारी गळचेपी भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी बोलून दाखवली.

येत्या काळात भंडारा भाजपमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तीन गट सक्रिय झाले असून भाजप खासदार सुनील मेंढे, (Sunil Mendhe) विधान परिषदेचे आमदार परिणय फुके (Parinay Fuke) आणि माजी आमदार चरण वाघमारे असे तीन गट आहेत. २०१९च्या विधानसभा निवडणुकीमध्ये माजी आमदार चरण वाघमारे आणि आमदार परिणय फुके यांच्यातील वादामुळे भाजपला दारुण पराभव पत्करावा लागला होता. माजी आमदार चरण वाघमारे यांना पुन्हा पक्षात आणून भाजपने तेव्हा आपली चूक सुधारली होती. भंडारा जिल्ह्यात भाजप पुन्हा बलवान होईल, असे वाटत असतानाच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपासून पुन्हा गटबाजी उफाळून आली आहे.

खासदार सुनील मेंढे, विधान परिषदेचे आमदार परिणय फुके या दोन गटांकडून माजी आमदार चरण वाघमारे यांना विरोध करणे सुरू झाले आहे. भाजपमध्ये आपले खच्चीकरण करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे वाघमारे यांचे स्पष्ट म्हणणे आहे. कालपर्यंत गप्प असलेले माजी आमदार वाघमारे आज बोलले आणि पक्षात आपली गळचेपी होत असल्याचे जाहीरपणे बोलले. त्यामुळे ही गटबाजी आता पुन्हा वाढत जाणार, अशी एक शक्यता वर्तविली जात आहे. वरिष्ठ नेत्यांनी यात त्वरित लक्ष न घातल्यास येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपला त्याचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे.

Charan Waghmare, Parinay Fuke and Sunil Mendhe
भंडारा जिल्ह्यात भाजपमध्ये गटबाजी पोहोचली चरम सीमेवर...

सत्ता कुणाची ?

५२ सदस्य संख्या असलेल्या भंडारा जिल्हा परिषदेत काँग्रेस 21 जागा, भाजप 12, राष्ट्रवादी 13 आणि इतर 6 असे पक्षीय बलाबल आहे. एकंदरीतच जिल्हा परिषदेमध्ये बहुमताकरिता 27 सदस्य लागतात. मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही आणि कॉंग्रेस नेत्यांनी अद्यापही राष्ट्रवादीच्या नेत्यांशी संपर्क साधलेला नाही. या पक्षांनी सत्ता स्थापन करण्यासाठी कुठलीही बोलणी केली नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात काँग्रेससोबत भाजपमधील चरण वाघमारे गट सत्ता स्थापन करणार, अशी चर्चा रंगू लागली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांकडून भाजपच्या एका गटाला जवळ करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. पण त्यांना यश येत नाहीये.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com